विद्यार्थी जोमात, शिक्षक कोमात! पेपरमधील उत्तर पाहून व्हाल हैराण; वाचा, नेमका काय आहे 'हा' किस्सा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2021 03:19 PM2021-10-19T15:19:34+5:302021-10-19T15:20:41+5:30
Students funny answer sheet : विद्यार्थ्याने पेपरमध्ये लिहिलेलं उत्तर पाहून शिक्षकांनी थेट डोक्यालाच हात लावला आहे. सध्या याची सर्वत्र जोरदार चर्चा रंगली आहे.
नवी दिल्ली - अभ्यास, परीक्षा ही प्रत्येक विद्यार्थ्यांच्या आयुष्यात अत्यंत महत्त्वाची असते. पण कित्येकदा अभ्यास न झाल्याने परीक्षेत कॉपी केली जाते किंवा मग एखाद्या प्रश्नाचं उत्तर काहीही लिहिलं जातं. काही विद्यार्थी उत्तर लिहिण्याऐवजी चित्रपटातील गाणी अथवा डायलॉग लिहितात. तर काही जण वाटेल ते लिहितात. अशीच एक घटना आता पुन्हा एकदा समोर आली आहे. एका विद्यार्थ्याची उत्तरपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल होते आहे. विद्यार्थ्याने पेपरमध्ये लिहिलेलं उत्तर पाहून शिक्षकांनी थेट डोक्यालाच हात लावला आहे. सध्या याची सर्वत्र जोरदार चर्चा रंगली आहे.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर एका उत्तरपत्रिकेचा फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये विद्यार्थ्याने लिहिलेलं उत्तर पाहून तुम्हालाही धक्काच बसेल. शिक्षक कोमात आणि विद्यार्थी जोमात असंच म्हणावं लागेल. फन की लाइफ या इन्स्टाग्राम अकाऊंटवर या उत्तरपत्रिकेचा एक फोटो शेअर करण्यात आला आहे. उत्तरपत्रिकेवरून भाखडा नागल डॅमबाबत प्रश्न विचारण्यात आल्याची माहिती मिळत आहे. विद्यार्थ्याला नेमकं काय सांगायचं आहे, याचं उत्तर तर फक्त तोच देऊ शकतो.
विद्यार्थी जोमात, शिक्षक कोमात!
विद्यार्थ्याने आपल्या उत्तरामध्ये धरण सतलज नदीवर बांधलं आहे. पुढे तो सरदार पटेल, टाटा-बाय बाय, पंडित जवाहरलाल नेहरू, गुलाबाची शेती, चीन, लंडन, जर्मनी आणि विश्वयुद्धापर्यंत पोहोचतो आणि शेवटी फिरून तो विद्यार्थी पुन्हा पंजाब, सतलज नदी आणि धरणावर पोहोचतो. तसेच या उत्तरपत्रिकेवर दहापैकी शून्य गुण देण्यात आले आहे. सोबतच शिक्षक कोमात आहे, अशी कमेंटही दिलेली असल्याचं दिलं आहे. यावर अनेकांनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. सध्या तो फोटो तुफान व्हायरल होत असून चर्चेचा विषय ठरला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.