रेल्वे स्टेशनवर दोन इटुकल्या पिटुकल्या उंदरांचं भांडण; फोटोग्राफरनं टिपला सुंदर क्षण
By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2020 12:52 PM2020-02-17T12:52:24+5:302020-02-17T12:53:44+5:30
यंदाचा 55 वा वाईल्ड लाईफ फोटोग्राफीचा पुरस्कार देण्यात आला आहे.
प्राण्यांचे खेळणे, कुस्ती आदी प्रकार घरात किंवा जंगलात पाहिले असतील. घरात पाळलेली मांजर, कुत्रा यांना खेळताना अनेकदा पाहण्यात आले आहे. मात्र, आज एक फोटो असा आहे की त्याने वाईल्ड लाईफ फोटोग्राफीचा अवॉर्डही मिळवला आहे. तसेच सोशल मिडीयावर हा फोटो कमालीचा व्हायरल झाला आहे.
दी नॅचरल हिस्ट्री म्युझियमने हा फोटो पोस्ट केला आहे. यामध्ये त्यांनी यंदाचा वाईल्ड लाईफ फोटोग्राफीचा पुरस्कार देण्यात येत असल्याचे सांगितले आहे. हा फोटो सॅम रावले यांनी कैद केला आहे.
लंडनमधील एका रेल्वेच्या सबवे प्लॅटफॉर्मवर रावले यांनी हा सुंदर क्षण टिपला आहे. या फोटोने 40000 फोटोंमधून पहिला क्रमांक मिळविला आहे. हा फोटो व्हायरल झाल्यानंतर ट्विटरवर कमेंटचा महापूर आला होता. तसा उंदीर हा प्राणी आवडण्यासारखा नाही. मात्र, या फोटोतील दृष्यामुळे नेटकऱ्यांना चक्क उंदरांनाच पसंती दिली.
— Andy Bowers (@evilpez4) February 12, 2020
The winner of this year’s @LumixUK#WPYPeoplesChoice Award @NHM_WPY is Sam Rowley, with his well-timed portrait of two mice scrapping over food on a London Underground station platform. pic.twitter.com/5oOuxXxNVA
— Natural History Museum (@NHM_London) February 12, 2020