तीन विद्यार्थ्यांचा चालत्या ट्रेनमध्ये धारदार शस्त्र घेऊन स्टंट; व्हिडिओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2022 16:31 IST2022-10-12T16:25:33+5:302022-10-12T16:31:27+5:30
चालत्या ट्रेनमध्ये धारदार शस्त्र घेऊन स्टंट करत असल्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रकरणी चेन्नई पोलिसांनी तीन विद्यार्थ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

तीन विद्यार्थ्यांचा चालत्या ट्रेनमध्ये धारदार शस्त्र घेऊन स्टंट; व्हिडिओ व्हायरल
चालत्या ट्रेनमध्ये धारदार शस्त्र घेऊन स्टंट करत असल्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रकरणी चेन्नई पोलिसांनी तीन विद्यार्थ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेची माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी ट्विट करुन दिली आहे.
काही दिवसापूर्वी चालत्या ट्रेनच्या दरवाज्यामध्ये तीन विद्यार्थी हत्यार घेऊन स्टंट करत असल्याचे दिसले. यावेळी लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या तीन विद्यार्थ्यांची ओळख पटली असून, त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तीन विद्यार्थी रेल्वे स्थानकाच्या फलाटावर धारदार शस्त्रे घेऊन घोषणाबाजी करताना दिसत आहेत. अलीकडच्या काळात, रेल्वेमध्ये अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत.
We would like to inform you that the 3 youths seen in this viral video performing stunts with sharp weapons in their hand, have been arrested by @grpchennai! They are Anbarasu and Ravichandran from Gummidipoondi and Arul from Ponneri. They are all students of Presidency College. pic.twitter.com/3FQVpTWeoW
— DRM Chennai (@DrmChennai) October 11, 2022