Stunt Fail Video: स्टंट करणं तरूणीला पडलं महागात, बॅलन्स बिघडला अन्....

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2022 11:38 AM2022-04-13T11:38:33+5:302022-04-13T11:40:33+5:30

Stunt Fail Video : स्टंट फेल झाल्याचे व्हिडीओ पाहून अनेकांना हे कळून येतं की, काय करावं आणि काय करू नये. असाच एका तरूणीचा स्टंटचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. 

Stunt Fail Video : Girl fell on the ground while doing stunt | Stunt Fail Video: स्टंट करणं तरूणीला पडलं महागात, बॅलन्स बिघडला अन्....

Stunt Fail Video: स्टंट करणं तरूणीला पडलं महागात, बॅलन्स बिघडला अन्....

Next

Girl Stunt Gone Wrong: स्टंट करणं हे काही खायचं काम नाही. त्यासाठी मेहनत, प्रॅक्टिस आणि वेळ द्यावा लागतो. तेव्हा कुठे स्टंट यशस्वी होतात. पण काही लोक स्टंट करणं सोपं समजून तोंडावर पडतात. सोशल मीडियावर नेहमीच वेगवेगळे स्टंटचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. यात स्टंट यशस्वी झाल्याचे आणि फेल झाल्याचेही व्हिडीओ असतात. स्टंट फेल झाल्याचे व्हिडीओ पाहून अनेकांना हे कळून येतं की, काय करावं आणि काय करू नये. असाच एका तरूणीचा स्टंटचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. 

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओत एक तरूणी स्टंट करताना दिसत आहे. स्टंट दाखवण्याच्या नादात तरूणीला चांगला फटका बसला आहे. ती स्टंट करता करता धडामकन् जमिनीवर पडते. व्हिडीओ पाहिल्यावर तुम्हाला तरूणीवर दयाही येईल. पण जास्तीत जास्त लोक तरूणीवर हसताना दिसत आहेत. 

तुम्ही बघू शकता की, तरूणी एक हिरव्या रंगाची वस्तू जमिनीवर ठेवते. त्यावर एका प्लास्टिकच्या टपात पाणी ठेवते. यानंतर उडी मारून तरूणी टपात पाय ठेवण्याचा प्रयत्न करत होती. पण अशात तिचा बॅलन्स बिघडतो. त्यानंतर तिचा स्टंट फेल होतो आणि ती जमिनीवर पडते.

व्हिडीओत बघू शकता की, तरूणी जमिनीवर पडते तेव्हा तिला पाठीला जोरात लागल्याचं लक्षात येतं. हा व्हिडीओ manuf.i.t नावाच्या इन्स्टाग्राम पेजवर शेअऱ करण्यात आला आहे. व्हिडीओसोबत कॅप्शन देण्यात आलं आहे की, सेफ्टीशिवाय असे स्टंट अजिबात करू नका. या व्हिडीओला आतापर्यंत २.५ मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. तर ९४ हजारांपेक्षा जास्त लोकांनी व्हिडीओ लाइक केला आहे.

Web Title: Stunt Fail Video : Girl fell on the ground while doing stunt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.