बाईकवर स्टंट मारणे अंगलट; तरुणी चाकात अडकली अन्...धक्कादायक Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2024 07:01 PM2024-08-26T19:01:57+5:302024-08-26T19:02:28+5:30

हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Stunts on a bike; girl got stuck in wheel, shocking video went viral | बाईकवर स्टंट मारणे अंगलट; तरुणी चाकात अडकली अन्...धक्कादायक Video व्हायरल

बाईकवर स्टंट मारणे अंगलट; तरुणी चाकात अडकली अन्...धक्कादायक Video व्हायरल

Bike Stunt Video : आजची तरुण मुलं-मुली सोशल मीडियावर फेमस होण्यासाठी काहीही करायला तयार असतात. यामध्ये बाईकवर स्टंट मारणे नित्याचेच झाले आहे. सोशल मीडियावर अनेकदा अशाप्रकारची स्टंटचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. आता पुन्हा एकदा असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात बाईकवर मुलगा आणि मुलगी स्टंट मारण्याचा प्रयत्न करतात. पण, दुर्दैवाने मुलगी बाईकच्या चाकात अडकते. 

व्हायरल व्हिडिओमध्ये काय दिसले?
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक मुलगा स्पोर्ट्स बाईक चालवत असल्याचे दिसतोय अन् त्याच्या बाईकवर मागे एक मुलगीही बसलेली आहे. बाईक चालवत असताना तो तरुण अचानक स्टंट करण्यासाठी बाईकचे पुढचे चाक हवेत उचलतो. यावेळी मागे बसलेली मुलगी अचानक मागच्या टायरमध्ये अडकते. तो मुलगा तात्काळ बाईक थांबवतो, ज्यामुळे मुलीला दुखापत होत नाही. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

व्हिडिओ पहा:-

हा व्हिडिओ मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म X (पूर्वीचे ट्विटर) वर @VishalMalvi_ नावाच्या अकाउंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओ शेअर करताना त्यासोबत मजेशीर कॅप्शनही लिहिले आहे. 'निब्बी आणि छपरी' असे कॅप्शन व्हिडिओला दिले आहे. या व्हिडिओला बातमी लिहिपर्यंत 3 हजारांहून अधिक पाहिले आहे. तसेच, नेटकरी या व्हिडिओवर विविध प्रतिक्रियाही देत आहेत.

 

Web Title: Stunts on a bike; girl got stuck in wheel, shocking video went viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.