असा जुगाड... सिग्नलवरचे कॅमेरेही पकडू शकत नाहीत आणि ट्रॅफिक पोलिसही; Video व्हायरल...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2025 13:28 IST2025-01-02T13:27:43+5:302025-01-02T13:28:52+5:30

वाहतूक पोलिसांच्या सिग्नलवरील, स्पीड कॅमेरांच्या कचाट्यातून वाचण्यासाठी नंबरप्लेटवरील आकडे छोटे करणे, ठराविक फाँटमध्ये न लिहिने आदी गोष्टी केल्या जातात.

Such a gamble... Even the cameras at the signal can't catch it and neither can the traffic police; Video goes viral from china... | असा जुगाड... सिग्नलवरचे कॅमेरेही पकडू शकत नाहीत आणि ट्रॅफिक पोलिसही; Video व्हायरल...

असा जुगाड... सिग्नलवरचे कॅमेरेही पकडू शकत नाहीत आणि ट्रॅफिक पोलिसही; Video व्हायरल...

वाहतूक पोलिसांच्या सिग्नलवरील, स्पीड कॅमेरांच्या कचाट्यातून वाचण्यासाठी नंबरप्लेटवरील आकडे छोटे करणे, ठराविक फाँटमध्ये न लिहिने आदी गोष्टी केल्या जातात. पण चीनमधील एका व्यक्तीने असा जुगाड केला आहे की त्याला हे कॅमेरे पण पकडू शकत नाहीत आणि वाहतूक पोलिसही. या जुगाडाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. 

एका बस ड्रायव्हरने वायपर, तार आणि झाडाचे पान याच्या सहाय्याने हा जुगाड केला आहे. त्याने त्याच्या बसचा नंबर काही अंशी झाकण्यासाठी या पानाचा वापर केला आहे. हे पान त्याचे दोन आकडे झाकत आहे. जेव्हा रस्त्यावरून जात असतो तेव्हा तो हे पान नंबरप्लेटवर आणून ठेवतो. यामुळे स्पीड कॅमेरा, सिग्नलवरील कॅमेरा त्याला पकडू शकत नाहीत. 

मग जेव्हा पोलीस समोर असतात तेव्हा हा पठ्ठ्या वायपर सुरु करून ते पान नंबरप्लेटवरून हटवितो. यामुळे पोलिसांना नंबरप्लेट स्पष्ट दिसते. झाकलेली दिसत नसल्याने पोलिसांनाही संशय येत नाही व ते थांबवत नाहीत. पोलीस मागे गेले की तो पुन्हा वायपर मुळ जागी आणून ठेवतो. जेणेकरून ते पान पुन्हा नंबर प्लेटवर आडवे येईल. 

हे करण्यासाठी त्या महाशयाने वायपरला तारेने पान बांधले आहे. जे वायपर सुरु झाल्यावर लगेचच नंबर प्लेटवरून बाजुला होते. पुन्हा मुळ जागी वायपर आला की पुन्हा ते नंबर प्लेटवर येते. पोलिसांच्या चलनापासून वाचण्यासाठी बस चालकाने हा जुगाड केलेला आहे. 


Web Title: Such a gamble... Even the cameras at the signal can't catch it and neither can the traffic police; Video goes viral from china...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.