शहीद जवानांना वाळूशिल्पकाराची 'कलात्मक' श्रद्धांजली, पाहा व्हायरल फोटो
By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2020 12:15 PM2020-06-19T12:15:08+5:302020-06-19T12:20:49+5:30
चीनी सैनिकांच्या हल्ल्यात वीरमरण आलेल्या जवानांसाठी या वाळूशिल्पकाराने लक्षवेक्षी असे वाळूचे शिल्प साकारले आहे.
सोमवारी रात्री भारतीय आणि चीनी सैनिकांच्या झटापटीत २० भारतीय सैनिकांना आपले प्राण गमवावे लागले. या घटनेमुळे संपूर्ण देश हळहळला आहे. भारतीय सैनिकांना श्रद्धांजली देताना सोशल मीडियावर लोक आपले विचार मांडत आहेत. तसंच चीनबाबत प्रचंड संतापाचं वातावरण लोकांमध्ये आहे. अनेक ठिकाणी या जवानांना श्रद्धांजली देण्यासाठी शांततापूर्ण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं होतं.
दरम्यान एका वाळू शिल्पकाराने अनोख्या पद्धतीने जवानांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. वाळूशिल्पकार सुदर्शन पटनाईक यांनी हा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. चीनी सैनिकांच्या हल्ल्यात वीरमरण आलेल्या जवानांसाठी या वाळू शिल्पकाराने लक्षवेक्षी असे वाळूचे शिल्प साकारले आहे. जगन्नाथ पुरी बीचवर हे वाळूचे शिल्प साकारण्यात आले आहे.
Tribute to the Bravehearts of #IndianArmy who sacrificed their lives to protect our Motherland . My sand art at Puri beach in Odisha.
— Sudarsan Pattnaik (@sudarsansand) June 17, 2020
Jai Hind! pic.twitter.com/6LZ4jCmTMF
हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या फोटोला आतापर्यंत २० हजारांपेक्षा जास्त लाईक्स आणि १०० पेक्षा जास्त कमेंट्स आल्या असून ३ हजार रिट्विट्स आले आहेत. लोकांनी या फोटोला पसंती दर्शवली आहे.