Sudha Murty : साधेपणा असावा तर असा...; सुधा मुर्तींनी मंदिरात बनवलं जेवण, फोटो व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2023 03:20 PM2023-03-10T15:20:55+5:302023-03-10T15:23:06+5:30
नारायण मुर्ती यांच्या पत्नी आणि समाजसेविका सुधा मूर्ती आपल्या साधेपणासाठी ओळखल्या जातात.
जगातील सर्वात मोठ्या टेक कंपन्यांपैकी एक असलेल्या इन्फोसिसचे संस्थापक नारायण मुर्ती यांच्या पत्नी आणि समाजसेविका सुधा मूर्ती आपल्या साधेपणासाठी ओळखल्या जातात. पती एवढ्या मोठ्या कंपनीचे संस्थापक आणि जावई ब्रिटनचा पंतप्रधान असूनही त्यांनी आपली साधी राहणी बदलेली नाही. आजही त्यांच्या वागण्या-बोलण्यामध्ये कमालीचा आपलेपणा आहे. यातच आता सुधा मुर्ती यांचा एक फोटो व्हायरल होत आहे, ज्यात त्या मंदिरात जमिनीवर बसून जेवण बनवताना दिसत आहेत.
She comes from a wealthy family with a net worth exceeding ₹35,000,00,00,000 and her son-in-law happens to be the UK PM.
— P C Mohan (@PCMohanMP) March 9, 2023
She is a highly accomplished woman.
She remains down-to-earth and committed to preserving Indian tradition.
She is Padma Bhushan Sudha Murthy. pic.twitter.com/QN4wwFuQok
सुधा मुर्ती यांनी पोंगल उत्सवानिमित्त तिरुवअनंतपुरममध्ये आयोजित कार्यक्रमात हजेरी लावली. यावेळी कार्यक्रमात त्या इतर शेकडो महिलांप्रमाणे अगदी साधेपणाणे वावरल्या. त्यांना पाहून कुणी विचारही करणार नाही की, या अब्जाधीश नारायण मुर्ती यांच्या पत्नी आहेत. यावेळी त्यांनी मंदिरात खाली जमिनीवर बसून जेवणही बनवलं. त्यांचा जेवण बनवतानाचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावर नेटकरी विविध प्रतिक्रिया देत आहेत. भाजप नेते पीसी मोहन यांनीही ट्विटरवरुन सुधा मुर्ती यांचा फोटो शेअर केला आहे.