नादच खुळा! वय १० वर्ष, ११५ किलो वजन उचलतो, 'या' सुपर बॉयचा वर्ल्ड चॅम्पियन बनण्याच्या दिशेने प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2023 03:23 PM2023-03-22T15:23:26+5:302023-03-22T15:24:55+5:30

व्यायाम करण्याची आवड अनेकांना असते.

super boy rowan o malley 10 year old rowan deadlift 115kg one of britain strongest young schoolboys | नादच खुळा! वय १० वर्ष, ११५ किलो वजन उचलतो, 'या' सुपर बॉयचा वर्ल्ड चॅम्पियन बनण्याच्या दिशेने प्रयत्न

नादच खुळा! वय १० वर्ष, ११५ किलो वजन उचलतो, 'या' सुपर बॉयचा वर्ल्ड चॅम्पियन बनण्याच्या दिशेने प्रयत्न

googlenewsNext

व्यायाम करण्याची आवड अनेकांना असते, अनेकजण मोठे बॉडीबिल्डर बनतात. पण, यासाठी खूप कष्ट करावे लागतात. अगदी लहापणापासूनच व्यायाम करावे लागतं. असाच एक लहान मुलगा जिममध्ये व्यायाम करत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या  व्हिडीओ त दिसणारा मुलगा १० वर्षाचा आहे. या मुलाने वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षी जगातील सर्वात कठीण परीक्षा उत्तीर्ण केली. तो मुलगा ११५ किलोचे वजन उचलतो. 

हा मुलगा ब्रिटनमधील आहे, त्याचे नाव रोवन ओमॅली आहे. युनायटेड किंगडममधील सर्वात मजबूत शाळकरी म्हणून त्याला ओळखले जाते.  रोवनचे वजन फक्त ५४ किलो आहे आणि तो स्वतःच्या दुप्पट म्हणजे ११५ किलो वजन सहज उचलू शकतो. आत्तापर्यंत त्याने ४० हून अधिक शालेय स्पर्धा जिंकल्या आहेत. त्याचे कष्ट पाहून सरकार  याला थेट आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पाठवण्याची तयारी करत आहे. या वर्षाच्या अखेरीस तो अमेरिकेत होणाऱ्या स्पर्धेत सहभागी होण्याची तयारी करत आहे.

VIDEO : तरूणीने बॉयफ्रेंडला रंगेहाथ दुसऱ्या तरूणीसोबत पकडलं आणि मग....

रोवन याने १११ किलो वजन उचलण्याचा विक्रम मोडला. आतापर्यंत हा विक्रम अमेरिकेतील मुलाच्या नावावर होता. 'मला जगातील सर्वात बलवान माणूस व्हायचे आहे, असं रोवन याने म्हटले आहे. मी माझ्या आयुष्यातील बहुतांश वेळ जिममध्ये घालवत आहे, असंही त्याने सांगितले. रोवनला इतर मुलांप्रमाणे खेळ खेळण्यात रस नव्हता. त्याला जिममध्ये व्यायाम करायला आवडते, असं त्याची वडिलांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

कोव्हेंट्रीच्या शाळेत शिकणाऱ्या रोवनचा आहारही जबरदस्त आहे. ब्रिटनमध्ये, त्याच्या वयाच्या मुलांना जास्तीत जास्त २,००० कॅलरीज प्रथिनेयुक्त आहार घेण्याचा सल्ला दिला जातो. रोवन एका दिवसात ३,५०० कॅलरीज खातो. हे सर्वसामान्य प्रमाणापेक्षा तिप्पट आहे. सकाळची सुरुवात स्क्रॅम्बल्ड अंड्याने होते आणि तो दिवसातून तीन वेळा अंडी खातो. रात्रीचा स्टीक फिश हा त्याचा आवडता आहे. त्याचा वजन उचलतानाचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. 

Web Title: super boy rowan o malley 10 year old rowan deadlift 115kg one of britain strongest young schoolboys

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.