वाराणसीच्या घाटावर पेटणाऱ्या चितांवर दिसल्या लक्षवेधी आकृत्या; पाहून सारेच चक्रावले
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2021 12:55 PM2021-10-07T12:55:45+5:302021-10-07T13:02:52+5:30
मणिकर्णिका घाटातील पेटत्या चिंतावर दिसलेल्या आकृत्यांनी वेधलं लक्ष; फोटो व्हायरल
वाराणसी: महाकर्णिका घाटात बुधवारी पेटत्या चितांवर काही अजब आकृत्या पाहायला मिळाल्या. या आकृत्या पाहून तिथला प्रत्येक जण चक्रावला. मणिकर्णिका घाटात ज्यांचे अंत्यसंस्कार होतात, त्यांना मोक्ष प्राप्ती होते, असं म्हणतात. या घाटावर २४ तास चिता पेटत असतात. या घाटाचं महत्त्व अनन्यसाधारण आहे.
आयएमएस बीएचयूच्या न्यूरोलॉजी विभागाचे प्राध्यापक व्ही. एन. मिश्रा यांनी पेटत्या चितांचे दोन फोटो कॅमेऱ्यात कैद केले आहेत. हे फोटो त्यांनी ट्विटरवर शेअर केले आहेत. 'जेव्हा मी घाट वॉकवर मणिकर्णिका महातीर्थाचा फोटो काढला, तेव्हा त्यात वेगळंच चित्र दिसलं. पहिला फोटो गेल्या वर्षीचा आहे, तर दुसरा काल काढलेला आहे,' असं मिश्रा यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
प्राध्यापक विजय नाथ मिश्रा यांनी काढलेला फोटो सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. मिश्रा यांच्या ट्विटला ५०० हून अधिक जणांनी लाईक केलं असून अनेकांनी त्यावर कमेंट केली आहे. मणिकर्णिका घाट अत्यंत पवित्र घाटांपैकी एक मानला जातो. गंगा नदीच्या किनारी असलेल्या या घाटावर वर्षभर मोठी गर्दी असते.