बाबो! ....म्हणून इथं विकली जातेय ९ हजार रुपये किलोची सोन्याची मिठाई, वाचा खासियत
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2020 06:49 PM2020-10-31T18:49:33+5:302020-10-31T19:03:34+5:30
या सणाच्या दिवशी सुरत शहरात कोट्यावधी रुपयात (घारी) या गोल्ड मिठाईची विक्री केली जाते.
सूरतच्या दुकानादारानं चांदी पाडवा उत्सवाच्या आधी दुकानात एक आगळा वेगळा प्रकार मिठाईचा विकायला ठेवला आहे. गोड पदार्थांच्या यादीत स्वीट गोल्ड मिठाईचा समावेश केला आहे. ही स्वीट गोल्ड मिठाई सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या मिठाईचा फोटोही सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
वृत्तसंस्थेच्या एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, गोल्ड मिठाई ही सुरतच्या इतर व्यंजनांचा एक प्रकार आहे. चंडी पाडवा या सणाआधी या मिठाईची विक्री दुकानांमध्ये सुरू करण्यात येते. शरद पौर्णिमेनंतर येणारा हा उत्सव चांदी पाडवा म्हणून साजरा केला जातो.
Gujarat: Ahead of Chandi Padvo, a festival falling a day after Sharad Poornima, a sweet shop in Surat has launched 'Gold Ghari' -a different version of ghari, a sweet dish from Surat. Shop owner says, "It is available at Rs 9000/kg. Normal ghari is available at Rs 660-820 per kg" pic.twitter.com/7jkXVfCls2
— ANI (@ANI) October 30, 2020
या दुकानाचा मालक रोहन यांनी एनएनआयशी बोलतना सांगितले की, '' सध्या ९ हजार रुपये किलोने ही गोल्ड स्वीट मिठाई विकली जात आहे. साधी मिठाई ही ६६० ते ८२० रुपये प्रति किलोने विकली जात आहे.''
चांदणी पाडवा किंवा चांदी पाडवा हा एक सण आहे. ज्यावेळी सूरतचे रहिवासी (घारी) मिठाईचा आनंद घेतात. दूध, मावा, ड्रायफ्रुट्सचा भरभरून वापर ही मिठाई तयार करण्यासाठी केला जातो. लय भारी! ७० वर्षाच्या मराठमोळ्या आजींच्या रेसिपींची कमाल; YouTube ने सिल्वर बटन देऊन केला गौरव
इतकंच नाही तर इथली मिठाई संपूर्ण जगभरात प्रसिद्ध आहे. या सणाच्या दिवशी तासनतान रांग लावून लोक मिठाई विकत घेऊन जातात. या मिठाईसह फरसाण, चिवडा असे इतर पदार्थ घराघरात खाल्ले जातात. या सणाच्या दिवशी सुरत शहरात कोट्यावधी रुपयात (घारी) या गोल्ड मिठाईची विक्री केली जाते. सर्व सामान्यांपासून श्रीमंतापर्यंत सगळेच सण (घारी) ही स्पेशल मिठाई खाऊन आपला आनंद साजरा करतात. इंजिनिअर्सची कमाल! अख्खी ५ मजल्यांची इमारत एका जागेहून दुसरीकडे केली शिफ्ट, पाहा व्हिडीओ