'ना तिकीट, ना टीसी...' 'वंदे भारत'ट्रेनच्या थीमवर बनवलेल्या अनोख्या हॉटेलची सोशल मीडियावर हवा  

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2023 03:52 PM2023-12-22T15:52:51+5:302023-12-22T15:54:44+5:30

सध्या सोशल मीडियावर सुरतमधील एका हॉटेलची जोरदार चर्चा रंगली आहे. 

Surat vande bharat train themed hotel popular on social media, video goes viral  | 'ना तिकीट, ना टीसी...' 'वंदे भारत'ट्रेनच्या थीमवर बनवलेल्या अनोख्या हॉटेलची सोशल मीडियावर हवा  

'ना तिकीट, ना टीसी...' 'वंदे भारत'ट्रेनच्या थीमवर बनवलेल्या अनोख्या हॉटेलची सोशल मीडियावर हवा  

Vande Bharat Train Viral Video: बहुचर्चित वंदे भारत ट्रेन ही भारतातील विविध शहरांना जोडणारी सर्वात जलद ट्रेनपैकी एक आहे. पण या ट्रेनला पाहून कोणाच्याही डोळ्यासमोर प्रवासाचे चित्र उभे राहिल. याला सुरतमधील एक हॉटेल अपवाद ठरले आहे .

सुरतमधील एका हॉटेल मालकाने आपल्या हॉटेलची रचना हुबेहुबे वंदे भारत ट्रेनसारखी केली आहे. वंदे भारत ट्रेनची थीम फॉलो करत या व्यक्तीने आपल्या हॉटेलला नवा लूक दिला आहे. भारताच्या आलिशान सुपर फास्ट ट्रेनमधून प्रवास करणे हे प्रत्येकाला वाटते. सुरतमधील या हॉटेलमालकाने अनेकांचे स्वप्न सत्यात उतरवण्याचे काम केले आहे. वंदे भारत ट्रेनची सफर त्याशिवाय स्वादिष्ट जेवणाची मेजवाणी या हॉटेलमधील ग्राहकांना मिळू शकते. वंदे भारत ट्रेनच्या थीमवर आधारलेल्या या हॉटेलमध्ये खवय्यांना त्यांच्या जीभेचे चोचले देखील पुरवता येणार आहेत. 

'ला पिज्जा ट्रेनो' नावाने प्रसिद्ध असलेल्या या हॉटेलचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. एका ट्रेन कोचप्रमाणे रचना करण्यात आलेल्या हॉटेलमध्ये खवय्यांना जेवणाचा आस्वाद घेता येईल. वंदे भारत ट्रेनप्रमाणे रंग, डिझाईनचे पुरेपूर कॉम्बिनेशन करत या हॉटेलची रचना करण्यात आली आहे. 

सदर व्हायरल व्हिडीओ एका फूड ब्लॉगरने शेअर केला असून आतापर्यंत या व्हिडीओला २० लाखांहून अधिक लोकांनी पाहिले आहे. या अनोख्या ट्रेनच्या व्हिडीओला नेटकऱ्यांकडून भरभरून प्रतिसाद मिळतोय. शिवाय या हॉटेलमध्ये इंडियन, इटालियन तसेच  फ्रांसमधील वेगवेगळ्या व्हारायटीमधील फूड उपलब्ध असल्याचे सांगितले जात आहे.
येथे पाहा व्हिडीओ:

Web Title: Surat vande bharat train themed hotel popular on social media, video goes viral 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.