Sushant Singh Rajput Suicide: सुशांतच्या आत्महत्येला जबाबदार कोण?... नेटिझन्सचं एकच उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2020 01:38 PM2020-06-17T13:38:16+5:302020-06-17T15:31:28+5:30

पुन्हा एकदा Nepotism वर सोशल मीडियातून चर्चा होत आहे. अनेकजण करण जोहरवर टीका करत आहेत. #Nepotism वर लोक ट्विट करून त्यांच्या भावना व्यक्त करत आहेत. 

Sushant Singh Rajput’s death puts nepotism in spotlight again, Nepotism trending on twitter | Sushant Singh Rajput Suicide: सुशांतच्या आत्महत्येला जबाबदार कोण?... नेटिझन्सचं एकच उत्तर

Sushant Singh Rajput Suicide: सुशांतच्या आत्महत्येला जबाबदार कोण?... नेटिझन्सचं एकच उत्तर

Next

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांच्या आत्महत्येनंतर त्याच्या आत्महत्येच्या कारणांवरून वेगवेगळी चर्चा सुरू आहे. तो बॉलिवूडमधील नेपोटीज्ममुळे निराश असल्याचं बोललं जात आहे. त्याचे 6 सिनेमे बंद पडले होते आणि बॉलिवूडचा एक मोठा गट त्याला बाहेर काढण्याच्या प्रयत्नात होता अशीही चर्चा आहे. दरम्यान पुन्हा एकदा Nepotism वर सोशल मीडियातून चर्चा होत आहे. अनेकजण करण जोहर, सलमान खानवर टीका करत आहेत. #Nepotism वर लोक ट्विट करून त्यांच्या भावना व्यक्त करत आहेत. 

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येचं खरं कारण समोर आलं नसलं तरी एकंदर वेगवेगळ्या पोस्ट किंवा त्याच्या करिअरमध्ये सुरू असलेल्या गोष्टींवरून इंडस्ट्रीतील काही लोकांना यासाठी जबाबदार धरलं जात आहे. तशी तक्रारही काही जणांविरोधात करण्यात आलीये. या निमित्ताने आता पुन्हा एकदा Nepotism चा विषय निघाला की, लोकांनी सर्वातआधी करण जोहरला धारेवर धरलंय. 

इतकेच नाही तर सुशांत सिंह राजपूतच्या फॅन्सकडून करण जोहर विरोधात मोर्चाही काढण्यात आला. त्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यात करण जोहर मुर्दाबाद असे पोस्टर घेऊन लोक दिसताहेत.

केवळ करण जोहरला नाही तर काही लोक बॉलिवूड अभिनेता सलमान खान यालाही ट्रोल केलं जात आहे. त्याच्यावरही Nepotism वरून टीका केली जात आहे. 

सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या का केली याचं खरं कारण समोर आलेलं नाही. त्याने तशी काही सुसाइड नोटही लिहिली नव्हती. पण चर्चांच्या आधारे बॉलिवूडमधून त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न काही मोठे बॅनर्स करत होते, अशीही चर्चा होत आहे. पुन्हा एकदा Nepotism ची चर्चा होऊ लागली आहे. पण यातून खरंच काही निष्पन्न होणार आहे का? की काही दिवसांनी सगळं विसरून लोक आधीसारखं जगायला लागतील हे बघणं महत्वाचं ठरणार आहे.  खरंच आता Nepotism ला विरोध करणारे लोक स्टार किड्सचे सिनेमे बघणं सोडणार का हे बघणंही महत्वाचं ठरणा आहे. 

Web Title: Sushant Singh Rajput’s death puts nepotism in spotlight again, Nepotism trending on twitter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.