SUV Viral video: OMG! एसयुव्हीचा खतरनाक, हैराण करणारा स्टंट; तीन दिवसांत २६ कोटी वेळा पाहिला गेला Video

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2021 07:43 PM2021-12-31T19:43:09+5:302021-12-31T19:51:14+5:30

SUV stunt Viral video: सरत्या वर्षाला निरोप देत असताना एक व्हिडीओ इंटरनेटवर प्रचंड धुमाकुळ घालत आहे. फक्त तीन दिवसांत हा व्हिडीओ तब्बल २६ कोटींहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. 

SUV Viral video: OMG! Dangerous, stunts of SUVs; Video watched 26 crore times in three days | SUV Viral video: OMG! एसयुव्हीचा खतरनाक, हैराण करणारा स्टंट; तीन दिवसांत २६ कोटी वेळा पाहिला गेला Video

SUV Viral video: OMG! एसयुव्हीचा खतरनाक, हैराण करणारा स्टंट; तीन दिवसांत २६ कोटी वेळा पाहिला गेला Video

Next

बाईक, सायकलवरून स्टंट करतात हे सर्वांना माहिती आहे. अनेकदा तुमच्या आजुबाजुला किंवा टीव्हीवर तसे प्रकार सुरुही असतात. परंतू कारचा स्टंट करणे तसे फार कठीण काम, त्यातही एसयुव्हीचा स्टंट करणे. सरत्या वर्षाला निरोप देत असताना एक व्हिडीओ इंटरनेटवर प्रचंड धुमाकुळ घालत आहे. फक्त तीन दिवसांत हा व्हिडीओ तब्बल २६ कोटींहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. 

ड्रायव्हर फोक्सवॅगनची एसयुव्ही एका ट्रॅकवर चालवत आहे. हा ट्रॅक एसयुव्हींचे स्टंट करण्यासाठी बनविलेला असतो. म्हणजे खडी, डांबर. सिमेंट आदींचा नसतो बर का. तर खड्डे, चिखल, चढ उतार आदींचा असतो. असाच एक जवळपास १६० डिग्रीच्या कोनातील खड्डा होता, त्यात पाणी आणि पुढे रस्ता काढलेला होता. आपल्य़ाला साध्या उताराला भिती वाटते. १६० डिग्री काय...

पण या ड्रायव्हरने १६० डिग्रीच्या कोनात कार सुखरूप उभी केली. जरा जरी चूक झाली असती तरी ती एसयुव्ही उलट्या तोंडावर खाली पडली असती. पलटली असती किंवा खाली आदळली असती. हा व्हिडीओ Supercar Blondie फेसबुक पेजवर अपलोड करण्यात आला आहे. हा व्हिडीओ यूट्यूब वर @LifesTooShort सर्वात आधी अपलोड करण्यात आले होते. हा व्हिडीओ जवळपास २६ कोटी वेळा पाहिला गेला आहे. २८ डिसेंबरला हा व्हिडीओ अपलोड करण्यात आला होता. 

तुम्हीच पहा थरार....

Web Title: SUV Viral video: OMG! Dangerous, stunts of SUVs; Video watched 26 crore times in three days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.