अन्नासाठी शेतकऱ्यांवर नाही तर Swiggy वर अवलंबून; असं म्हणणाऱ्याला Swiggy नं दिलं जबरदस्त उत्तर
By Manali.bagul | Published: December 2, 2020 04:34 PM2020-12-02T16:34:00+5:302020-12-02T16:39:25+5:30
Viral Treading News in Marathi: सोशल मीडियावर शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देणारे आणि विरोध करणारे असे दोन गट दिसून येत आहेत.
नवीन कृषी विधेयकांवर नाराजी व्यक्त करत आंदोलनात सक्रिय राहण्याची ठाम भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे. त्यामुळे पाचव्या दिवशी शेतकऱ्यांचे आंदोलन चिघळल्याचे चित्र दिसत आहे. शेतकऱ्यांच्या या आंदोलनामुळे सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं असून केंद्र सरकार विरूद्ध शेतकरी असा संघर्ष पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देणारे आणि विरोध करणारे असे दोन गट दिसून येत आहेत. अशाच एका संवादाच्या ट्विटवर फूड डिलेव्हरी अॅप असणाऱ्या ‘स्विगी’ने दिलेलं उत्तर सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
Had an argument with my Bhakt friend over farmers protest.
— Nimo Tai 2.0 (@Cryptic_Miind) November 30, 2020
He said that we are not dependent on farmers for food. We can always order food from Swiggy.
He won.
१४ हजारांहून अधिक फॉलोअर्स असलेल्या क्रिपिएस्ट माईण्ड नावाच्या ट्विटर हॅण्डलवरुन शेतकरी आंदोलनासंदर्भात एक ट्विट करण्यात आलं. यामध्ये ट्विट करणाऱ्या सोशल इन्फ्ल्युएन्सरने, “शेतकरी आंदोलनासंदर्भात भक्त असणाऱ्या माझ्या एका मित्रासोबत चर्चा केली. त्याने मला आपण अन्नपदार्थांसाठी शेतकऱ्यांवर अवलंबून नाही. आपण कधीही हवं ते अन्नपदार्थ स्विगीवरुन मागवू शकतो असं म्हटलं. त्यानंतर तू जिंकला म्हणून विषय सोडून दिला,” असा उल्लेख करण्यात आहे. हृदयद्रावक! आयसीयुमधील कोरोनाग्रस्त आजोबांना डॉक्टरांनी दिली हळवी गळाभेट, फोटो व्हायरल
sorry, we can't refund education 🤷🏻♀️
— Swiggy (@swiggy_in) November 30, 2020
अन्नासाठी आपण शेतकऱ्यांवर नाही तर स्विगीवर अवलंबून राहू शकतो असं म्हणणाऱ्या व्यक्तीच्या शिक्षणावरील खर्च वाया गेल्याचा खोचक टोला स्विगीने लगावला आहे. सध्या स्विगीचं हे ट्विट सोशल मीडियावर व्हायरल झालं असून चर्चेचा विषय ठरले आहेत. लय भारी! माय लेकाची बातच न्यारी, पत्नी किंवा प्रेयसी नाही तर आईसोबत करतोय परदेशवारी