१ नंबर जोडपं! आजारपणात पत्नीनं साथ सोडली; पतीनं बनवला तिचा हुबेहूब पुतळा 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2020 11:33 AM2020-09-13T11:33:17+5:302020-09-13T11:41:11+5:30

आपल्या पत्नीवर अफाट प्रेम करत असलेल्या कलियुगातील शाहाजहानची कहाणी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

Tamil nadu man establish statue of his wife in home after her death | १ नंबर जोडपं! आजारपणात पत्नीनं साथ सोडली; पतीनं बनवला तिचा हुबेहूब पुतळा 

१ नंबर जोडपं! आजारपणात पत्नीनं साथ सोडली; पतीनं बनवला तिचा हुबेहूब पुतळा 

Next

नवरा बायकोचं एकमेकांवर खूप प्रेम असतं. एकदा लग्नबंधनात अडकल्यानंतर एकमेकांच्या सहवासाची सवय झालेली असते. शेवटच्या श्वासापर्यंत आपल्याला जोडीदाराची हवी असं प्रत्येकालाच वाटत असतं. अचानक आपली जवळची व्यक्ती सोडून गेल्यानंतर खूप एकटं, अस्वस्थ  वाटू लागतं. आपल्या पत्नीवर अफाट प्रेम करत असलेल्या कलियुगातील शाहाजहानची कहाणी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

तामिळनाडूच्या  ७४ वर्षीय गृहस्थाच्या पत्नीचा मृत्यू झाला. आपली पत्नी नेहमी आपल्या सोबत आहे असं वाटण्याासाठी त्यांनी आपल्या पत्नीप्रमाणे दिसणारा हुबेहुब पुतळा तयार केला आहे. दिवंगत एस पीचाईमनी याचं वय ६७ वर्ष होतं. १० ऑगस्टला हृदय विकारच्या झटक्यानं त्यांचा मृत्यू झाला. पत्नीचा मृत्यू झाल्यानंतर सीथूरामन यांना फार त्रासाचा सामना करावा लागला. पत्नीच्या सोडून जाण्यानं खूपच एकटं वाटत होतं. म्हणून त्यांनी एका महिन्यानंतर आपल्या पत्नीचा पुतळा तयार करण्यास सांगितले. 

एएनआयशी बोलताना सीथूरामन यांनी सांगितले की, ''मी माझ्या पत्नीला गमावलं असून जेव्हाही तिचा पुतळा पाहतो तेव्हा ती माझ्या जवळ असल्याप्रमाणे भासते. मी सरकारी नोकरी सोडून रिअल इस्टेटचा व्यवसाय सुरू केला. त्यावेळी मला खूप नुकसानाचा सामना करावा लागला अशा स्थितीत माझी पत्नी  जवळच्या मैत्रिणीप्रमाणे माझ्यासोबत उभी होती.'' हा पुतळा तयार करण्याासाठी रबर, फायबर आणि वेगवेगळ्या रंगांचा वापर करण्यात आला आहे. 

काही महिन्यापूर्वी कर्नाटकातील उद्योगपती श्रीनिवास गुप्ता यांनी आपल्या देवाघरी गेलेल्या पत्नीचा (सिलिकॉन) मेणाचा पुतळा तयार केला होता. या मेणाच्या पुतळ्यासोबतच त्यांनी आपल्या नवीन घरात प्रवेश केला होता. २०१७ मध्ये एका कार अपघातात श्रीनिवास गुप्ता यांच्या पत्नीने आपले प्राण गमावले होते.   नवीन घरात प्रवेश करण्यासाठी त्यांनी मुर्तीकाराकडून आपल्या पत्नीसारखा हुबेहूब मेणाचा पुतळा तयार करून घेतला होता. माधवी गुप्ता यांच्या या पुतळ्याचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते.  

हे पण वाचा-

नंबर १ जुगाड! मास्क लावायला विसरला अन् मग केलं असं काही...; पाहा व्हायरल फोटो

वाह रे पठ्ठ्या! एकेकाळी लग्नांमध्ये डिजे वाजवायचा; अन् आता १५ कोटींच्या बिजनेसचा मालक, थक्क करणारा प्रवास

Web Title: Tamil nadu man establish statue of his wife in home after her death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.