कडक सॅल्यूट! मुसळधार पावसात उभं राहत कर्तव्य करणाऱ्या पोलिसाचा फोटो व्हायरल; नेटिझन्सनी केलं कौतुक
By manali.bagul | Published: November 19, 2020 06:04 PM2020-11-19T18:04:38+5:302020-11-19T18:06:13+5:30
Viral Video of Tamilnadu constable : ट्रॅफिक पोलिस कर्मचारी भर पावसात उभं राहून वाहतूकीवर नियंत्रण मिळवताना दिसून येत आहेत.
नेहमी गजबजलेल्या रस्त्यावर ट्रॅफिक होऊ नये म्हणून पोलिस कर्मचारी काळजी घेत असतात. अशा स्थितीत जर मुसळधार पाऊस पडत असेल तर जबाबदारी जास्त वाढते. कारण पाऊस वेगाने पडत असल्यामुळे अनेक रस्ते फुटपाथ पाण्याने तुडूंब भरलेले असतात. अडकलेल्या गाड्यांना वाट दाखवणं कठीण असतं. अशावेळी ट्रॅफिक पोलिस महत्वाची भूमिका पार पाडतात.
सोशल मीडियावर एका ट्रॅफिक पोलिसाचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. मुसळधार पावसात आपलं काम इमानदारीने करत पोलिस वाहतूक कोंडीवर नियंत्रण मिळवत आहे. याआधीही तुम्ही ट्रॅफिक पोलिसाच्या कामगिरीचे अनेक व्हिडीओ पाहिले असतील. हा व्हिडीओ तामिळनाडूमधील तुतुकुडी- पलायामकोटाई रोडचा आहे. या ठिकाणी माथुराजा नावाचा एक ट्रॅफिक पोलिस कर्मचारी भर पावसात उभं राहून वाहतूकीवर नियंत्रण मिळवताना दिसून येत आहेत.
आपल्या युनिफॉर्मवर रेनकोट घालून भर पावसात कसलीही पर्वा न करता हा पोलिस कर्मचारी आपलं कर्तव्य पूर्ण करत आहे. दरम्यान ट्रॅफिकमध्ये अडकलेल्या एका व्यक्तीने या पोलिसाचा फोटो आणि व्हिडीओ काढून सोशल मीडियावर शेअर केला. त्यानंतर या व्हिडीओला सोशल मीडिया युजर्सनी चांगलीच पसंती दिली. माणूसकीला सलाम! हत्तीने एक पाय गमावला; अन् या देवमाणसानं 'असा' आधार दिला, पाहा व्हिडीओ
त्यानंतर डिपार्टमेंटच्या इतर पोलिसांसह सोशल मीडिया युजर्सनी सुद्धा पोलिसांच्या कामगिरीचं कौतुक केलं. वरिष्ठ पोलिस अधिक्षकांनी एस जयकुमार माथुराजा यांना प्रत्यक्षात भेटून त्यांचे कौतुक केलं आणि या कामगिरीबद्दल गौरवण्यात आलं. जिल्हा पोलिसांनीही आपल्या फेसबूक पेजवर या पोलिसाचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. याला म्हणतात नशीब! घरावर कोसळला दगड अन् काही मिनिटांत करोडपती झाला ना राव...