वनविभागाने घडवली मादी हत्तीणीची पिल्लाशी भेट;  व्हायरल व्हिडीओने जिंकली नेटकऱ्यांची मनं

By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2024 12:43 PM2024-01-01T12:43:24+5:302024-01-01T12:44:34+5:30

जगात माणुसकी आणि भूतदया अजूनही जिवंत आहे याची प्रचिती देणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

Tamilnadu forest department reunited a lost baby elephant with its mother and herd at the anamalai tiger reserve in pollachi video goes viral on social media | वनविभागाने घडवली मादी हत्तीणीची पिल्लाशी भेट;  व्हायरल व्हिडीओने जिंकली नेटकऱ्यांची मनं

वनविभागाने घडवली मादी हत्तीणीची पिल्लाशी भेट;  व्हायरल व्हिडीओने जिंकली नेटकऱ्यांची मनं

Viral Video : माणसांप्रमाणे प्राण्यांनाही भावभावना असतात. शिवाय माणूस असो वा प्राणी त्यांच्यामध्ये एक साम्य असतं ते म्हणजे आईचे प्रेम. जसा माणसांचा जीव आपल्या लेकरांमध्ये अडकतो, त्याचप्रमाणे प्राण्यांचाही जीव त्यांच्या पिल्लांमध्ये अडकलेला असतो. आपलं लेकरू स्वत: पासून काही वेळासाठी लांब झालं तरी प्राण्यांचासुद्धा जीव व्याकूळ होतो. असाच एक भावूक करणारा व्हिडीओ समोर आला आहे. आपल्या लहान पिल्लापासून ताटातूट झाल्याने हवालदिल होणाऱ्या हत्तीणीची व्यथा मांडणारा हा व्हिडीओ आहे.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ नुकताच शेअर करण्यात आलाय. मिळालेल्या माहितीनुसार हा व्हिडीओ तामिनाडूमधील असल्याचे स्पष्ट होतंय. व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये एकमेकांची चुकामूक होऊन हत्तीणीची तिच्या लेकरापासून ताटातूट झाली होती.  तामिळनाडूच्या वनविभागातील अधिकाऱ्यांनी या माय- लेकराची भेट अखेर भेट घडवून आणली. तामिळनाडू वनविभागाच्या अधिकाऱ्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरीही भावूक झाल्याचे पाहायला मिळतंय. 

मिळालेल्या माहितीनुसार हत्तीचं एक पिल्लू कळपातून भरकटलं होतं. मादी हत्तीण म्हणजेच त्या पिल्लाची आई त्याचा शोध घेत होती. तिच्या पिल्लाची भेट घडवून आणण्यासाठी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी आपल्या जीवाची पर्व न करता नदी-नाले पायाखाली तुडवत या मुक्या जीवांची भेट घडवली. आपल्या आईला भेटल्यानंतर हत्तीणीचं पिल्लू फार आनंदी झाल्याचे व्हिडीओमध्ये दिसतंय. आईला भेटण्यासाठी उत्सुक असलेल्या पिल्लीची धावफळ यातून दिसतेय. 

दरम्यान, हा व्हायरल व्हिडीओ नेटकऱ्यांना चांगलाच भावला आहे. शिवाय या व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या पसंतीस देखील उतरला आहे.

पाहा व्हिडीओ: 

Web Title: Tamilnadu forest department reunited a lost baby elephant with its mother and herd at the anamalai tiger reserve in pollachi video goes viral on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.