धक्कादायक! फेकलेल्या 'सॅनिटरी पॅड'चा नशेसाठी वापर, जीवाला दुप्पट धोका!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2018 12:50 PM2018-11-17T12:50:46+5:302018-11-17T12:57:09+5:30
वेळेनुसार नशेची दुनियाही बदलत आहे. फ्लेवर हुक्का, वेगवेगळ्या सिगारेट्स, गांजा आणि चरस या गोष्टी कॉमन होताना दिसत आहेत.
काळानुसार नशेची दुनियाही बदलत आहे. फ्लेवर हुक्का, वेगवेगळ्या सिगारेट्स, गांजा आणि चरस या गोष्टी कॉमन होताना दिसत आहेत. या पदार्थांची नशा करणे जगभरातील तरुणाईमध्ये एकप्रकारची फॅशनच समजली जाते. पण काय? नशा, तर नशा आहे. त्याने होणारे नुकसानात कुणालाही सुट नाही. काही लोक नशेसाठी महागडी उत्पादने खरेदी करु शकत नाहीत. अशात त्यांनी नशेसाठी एक धक्कादायक आणि जीवघेणा पर्याय शोधून काढला आहे. अलिकडे इंडोनेशियामधील तरुण सॅनेटरी पॅड उकळून ते पाणी पिऊन नशा करत आहेत. हा नशा त्यांच्यासाठी दुप्पट हानिकारक ठरत आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, हा जीवघेणा नशा करण्यासाठी इंडोनेशियातील तरुण आधी सॅनिटरी पॅड पाण्यात उकळतात. नंतर ते पाणी पितात. या नशेनंतर ते वेगळ्याच विश्वात हरवतात. एका व्यक्तीचं म्हणनं आहे की, सॅनिटरी पॅडचा नशा केल्यावर तो वेगळ्याच दुनियेत असतो, आणि त्याला हवेत उडत असल्यासारखं जाणवतं.
नॅशनल नारकोटिक्स एजन्सीचे वरिष्ठ कमांडर सुप्रिनर्टो यांनी एका आंतरराष्ट्रीय वृत्तवाहिनीला सांगितले की, हे तरुण कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून वारलेले पॅड्स उचलतात. त्यानंतर ते पाण्यात उकळतात आणि ते पाणी थंड झाल्यावर पितात. पण या सॅनिटरी पॅडमध्ये सोडियम पॉलीक्रायलेट असतं, जे द्रव्य पदार्थ शोषूण घेण्यासाठी मदत करतं. हे पोटात गेल्याने जीवाला धोका पोहोचू शकतो.
स्थानिक वृत्तांनुसार, इंडोनेशिया चाइल्ड प्रोटेक्शन कमीशनचे सदस्य Sitty Hikmawatty यांचं म्हणनं आहे की, जे लोक ड्रग्स किंवा अल्कोहोल खरेदी करु शकत नाहीत, त्यांच्यांसाठी नशा घेण्याचा हा स्वस्त पर्याय आहे.