त्रिवार सलाम! जेसीबीतून उडी घेत जवानानं वाचवले कुत्र्याचे प्राण; पाहा थरारक व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2020 06:57 PM2020-09-17T18:57:46+5:302020-09-17T19:41:25+5:30

वाढत्या पाण्याच्या प्रवाहात नदीत अडकलेल्या कुत्र्याला वाचवण्यासाठी होमगार्ड जवानानं जेसीबीतून नदीत उडी घेतली आणि नदीत उतरला होता. 

Telangana home guard jawan rescues dog in overflowing stream in nagarkurnool viral video | त्रिवार सलाम! जेसीबीतून उडी घेत जवानानं वाचवले कुत्र्याचे प्राण; पाहा थरारक व्हिडीओ

त्रिवार सलाम! जेसीबीतून उडी घेत जवानानं वाचवले कुत्र्याचे प्राण; पाहा थरारक व्हिडीओ

Next

माणसांचं आणि प्राण्याचं नातं काही वेगळंच असतं. वेळ पडल्यास प्राणी माणसांसाठी आपल्या जीवाची बाजी लावण्यास तयार होतात. तुम्ही आतापर्यंत असे अनेक व्हिडीओ पाहिले असतील. सोशल मीडियावर एका कुत्र्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. तेलंगणा राज्यातील एका जवानानं आपल्या जीवाशी खेळून कुत्र्याचा जीव वाचवला आहे. वाढत्या पाण्याच्या प्रवाहात नदीत अडकलेल्या कुत्र्याला वाचवण्यासाठी होमगार्ड जवानानं जेसीबीतून नदीत उडी घेतली आणि नदीत उतरला होता. 

प्रसंगावधान दाखवत जवानाने केलेल्या कार्याबद्दल सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे. वृत्तसंस्था एएनआयनं हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता होमगार्ड जवान आधी जेसीबीवर बसला आहे.  कुत्र्याला वाचवण्यासाठी  झाडांचा आधार घेत तो वाहत्या नदीत उतरुन कुत्र्याचे प्राण वाचवतो. 

या होमगार्ड जवानाचं नाव मुजीब आहे. नगरकुरनूलमध्ये वेगात वाहत असलेल्या नदीत हा कुत्रा अडकला त्यानंतर प्रसंगावधान दाखवत या  होमगार्डनं कुत्र्याचा जीव वाचवला आहे. हा व्हिडीओ १७ सप्टेंबर दुपारी शेअर करण्यात  आला होता. या व्हिडीओला आतापर्यंत १५ हजारांपेक्षा जास्त व्यूज आणि ८ हजारांपेक्षा जास्त लाईक्स आणि ७०० पेक्षा जास्त रिट्विट्स आले आहेत. या कामगिरीबद्दल होमगार्डवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. 

हे पण वाचा-

बापरे! खड्ड्यात अडकलेला ट्रक बाहेर काढायच्या नादात 'असं' काही झालं; पाहा व्हायरल व्हिडीओ

लय भारी! कोरोनाच्या भीतीनं पाणीपुरीवाल्यानं केलेला जुगाड पाहून म्हणाल; वाह क्या बात है...

Web Title: Telangana home guard jawan rescues dog in overflowing stream in nagarkurnool viral video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.