त्रिवार सलाम! अंधारात जलमय झालेल्या रस्त्यावर 'त्या'नं गाड्यांना दाखवली वाट, पाहा VIDEO
By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2020 01:51 PM2020-10-18T13:51:04+5:302020-10-18T13:53:37+5:30
काही ठिकाणी गाड्या वाहून गेल्या तर गाड्यांमध्ये पाणी शिरल्यामुळे रस्त्यात अडकून पडल्या होता. अनेक ठिकाणी पोलिसांनी आणि स्थानिकांनी गाड्यांना बाहेर येण्यासाठी वाट काढून दिली.
महाराष्ट्राप्रमाणेच इतर राज्यातही पूरस्थिती निर्माण झाली आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना पुराचा तडाखा बसला आहे. नद्या-ओढ्यांमध्ये पाणी भरल्यामुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरलं तर कुठे संपूर्ण रस्ते हे पाण्याखाली गेले. काही ठिकाणी गाड्या वाहून गेल्या तर गाड्यांमध्ये पाणी शिरल्यामुळे रस्त्यात अडकून पडल्या होता. अनेक ठिकाणी पोलिसांनी आणि स्थानिकांनी गाड्यांना बाहेर येण्यासाठी वाट काढून दिली.
#WATCH Rachakonda: Abdullapurmet Police pulls out a car stuck in overflowing water with the help of a JCB machine. #Telangana (17.10) pic.twitter.com/AWEC4q1UQc
— ANI (@ANI) October 17, 2020
तेलंगणामध्येही महापूरामुळे रस्ते संपूर्ण जलमय झाले होते. जेसीबीचा वापर करून पावसाच्या पाण्यात अडकलेल्या गाड्या बाहेर काढाव्या लागत होत्या. या घटनेचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, पाण्यात अडकलेली कार काढण्यासाठी पोलिस कर्मचारी आणि काही तरूण स्वतःच्या जीवाशी खेळून मदतकार्य करत आहेत.
तुम्ही या व्हिडीयोमध्ये पाहू शकता वेगाने पाणी वाहत आहे. एका दिव्याचा प्रकाश सोडता संपूर्ण रस्ता हा पाण्याने तुडूंब भरलेला असून अंधार दाटून आला आहे. एनएनआय वृत्तसंस्थेने या घटनेबाबत ट्विट करत माहिती दिली आहे. देवमासा ठरला देवदूत! Whale ने केली उलटी अन् 'तो' करोडपती झाला ना राव....
तेलंगणामध्ये गेल्या 5 दिवसांपासून मुसळधार पावसानं धुमाकूळ घातला आहे. परिणामी भयंकर पूरस्थिती निर्माण झाली आहे. परिस्थिती इतकी गंभीर आहे की, जेसीबीचा वापर अंधारात गाड्याबाहेर काढण्यासाठी करावा लागत आहे. आधी कोरोनामुळे झालेला लॉकडाऊन आणि आता या पावसाच्या संकटाने नागरिकांना मोठ्या नुकसानाचा सामना करावा लागला आहे. महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी परतीच्या पावसानं थैमान घातलं असून संपूर्ण पीकंच्या पीकं ही पाण्याखाली वाहून गेली आहेत. Video: गावात विकास झालाय का? असं रिपोर्टरने विचारलं, अन् आजोबांनी दिलेलं उत्तर झालं व्हायरल