शोधाल तर सापडेल! फोटोत दडलेयत ६ इंग्रजी शब्द, जिनियस असाल तर लागतील फक्त १० सेकंद

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2022 06:25 PM2022-08-29T18:25:13+5:302022-08-29T18:38:30+5:30

आम्ही तुम्हाला असं एक चित्र दाखवणार आहोत ज्यातील इंग्रजी ६ शब्द शोधण्यामध्ये भल्याभल्यांना यश आलेलं नाही. कारण हे शब्द फक्त १० सेकंदात शोधायचे आहेत. तुम्हाला जर असं वाटत असेल की तुम्ही हे करु शकता तर वाट कसली पाहाताय लागा कामाला.

test your iq spot six 6 words in the picture which is currently viral on social media | शोधाल तर सापडेल! फोटोत दडलेयत ६ इंग्रजी शब्द, जिनियस असाल तर लागतील फक्त १० सेकंद

शोधाल तर सापडेल! फोटोत दडलेयत ६ इंग्रजी शब्द, जिनियस असाल तर लागतील फक्त १० सेकंद

Next

ऑप्टिकल इल्युजनचे फोटो म्हटले की तुमच्या बुद्धीचा आणि नजरेचा कस लागतो. तुमची नजर जर तीक्ष्ण असेल तर अनेक कोडी तुम्ही चुटकीसरशी सोडवू शकता. पण आता आम्ही तुम्हाला असं एक चित्र दाखवणार आहोत ज्यातील इंग्रजी ६ शब्द शोधण्यामध्ये भल्याभल्यांना यश आलेलं नाही. कारण हे शब्द फक्त १० सेकंदात शोधायचे आहेत. तुम्हाला जर असं वाटत असेल की तुम्ही हे करु शकता तर वाट कसली पाहाताय लागा कामाला.

चित्राचं निरिक्षण करण्यापुर्वी तुम्ही १० सेकंदाचा टायमर लावा. त्यानंतरच हे ६ शब्द शोधायला सुरुवात करा. तुमचं खरं कौशल्य तरच सिद्ध होईल जर हे ६ इंग्रजी शब्द तुम्ही १० सेकंदात शोधुन दाखवले. तुम्हाला आम्ही एक क्लु देतो ज्यामुळे तुमचं चॅलेंज आणखी सोप होईल. हा क्लु म्हणजे हे सर्व शब्द पुस्तके किंवा वाचण्याशी संबंधित आहेत.

काय मग? १० सेकंद उलटुन गेली? तरीही बराच वेळ डोक खाजवुनही नाही सापडले हे शब्द? ठीक आहे. चिंता नसावी, आम्ही आहोत तुमच्या मदतीला. या चित्राकडे व्यवस्थित पाहा. खालच्या फोटोमध्ये आम्ही तुमच्यासाठी हे शब्द सर्कल केले आहेत. हे शब्द आहेत, बुक, नॉवेल, स्टोरी, रीड, पेज आणि वर्ड्स.

झालात ना चकित? आता हे कोड तुमच्यापुरतच ठेऊ नका. जरा तुमच्या मित्रांनाही डोक खाजवायला लावा. बघा त्यानांतरी जमतंय का? की त्यांचीही फजिती होतेय? ही बातमी जास्तीत जास्त शेअर करा आणि द्या हे चॅलेंज इतरांना.

Web Title: test your iq spot six 6 words in the picture which is currently viral on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.