VIDEO : मासे पकडायला गळ टाकला; अन् समोर जे आलं ते पाहून बोलतीच बंद!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2019 03:10 PM2019-08-29T15:10:03+5:302019-08-29T15:10:19+5:30

आपण दररोज आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या चित्र-विचित्र गोष्टी पाहत असतो. अशीच एक घटना अमेरिकेतील टेक्सामध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीसोबत घडली आहे. या व्यक्तीचं नाव चेज मॅकर असून ते हॅरिस काउंटीच्या लांग्हम क्रिकवर फिशिंग करण्यासाठी गेले होते.

Texas houston man catches fish and find snake attached watch viral video | VIDEO : मासे पकडायला गळ टाकला; अन् समोर जे आलं ते पाहून बोलतीच बंद!

VIDEO : मासे पकडायला गळ टाकला; अन् समोर जे आलं ते पाहून बोलतीच बंद!

Next

आपण दररोज आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या चित्र-विचित्र गोष्टी पाहत असतो. अशीच एक घटना अमेरिकेतील टेक्सामध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीसोबत घडली आहे. या व्यक्तीचं नाव चेज मॅकर असून ते हॅरिस काउंटीच्या लांग्हम क्रिकवर फिशिंग करण्यासाठी गेले होते. त्यानी मासे पकडण्यासाठी पाण्यात गळ टाकला आणि गळाला मासा लागण्याची वाट पाहत बसले. काही वेळाने गळाला काहीतरी लागलं, त्यामुळे त्यांनी काटा पाण्याबाहेर काढण्यास सुरुवात केली. पण त्यांनी जे पाहिलं ते अत्यंत भयानक होतं. 

खरं तर चेज यांच्या गळाला मासाच लागला होता, पण गळाला लागलेला अर्धा मासा एका अजगराने अर्धा खाऊन टाकला होता. त्यामुळे गळासोबत मासा आणि अजगर असे दोघेही पाण्याबाहेर आले होते. सोशल मीडियावर हा शॉकिंग व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत असून व्हिडीओ पाहून अनेक लोक हैराण झाली आहेत. 

कधीच पाहिली नसतील ही दृश्य... 

वायरल होणाऱ्या हा व्हिडीओ मागील महिन्यात म्हणजेच जुलैमध्ये ट्विटरवर शेअर करण्यात आला होता. ही बातमी लिहीपर्यंत हा व्हिडीओ जवळपास 50 लाख लोकांनी पाहिला आहे. तसेच 54 हजारपेक्षा जास्त रि-ट्विट्स आणि 2 लाखांपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत. 

नेटकरीही झाले हैराण

व्हिडीओ पाहून हैराण झालेल्या नेटकऱ्यांनी आपल्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. तसेच काहींना तर हे खरचं असं आहे का? असा प्रश्नदेखील पडला आहे. 

 

Web Title: Texas houston man catches fish and find snake attached watch viral video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.