Thai Barber Shop Advertisement: केशकर्तनालयाची जाहिरात की आणखी काही? फोटो पाहून थाई लोक पार येडे झाले

By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2022 11:19 PM2022-02-09T23:19:21+5:302022-02-09T23:21:05+5:30

Thai Barber Shop Advertisement goes wrong: खुर्चीवर पुरुष बसलेले आहेत आणि ते खूप खूश दिसत असल्याचे या जाहिरातीत दाखविण्यात आले आहे.

Thai Barber Shop Advertisement: After seeing the photos, the Thai people came mad over thai message or Brothel | Thai Barber Shop Advertisement: केशकर्तनालयाची जाहिरात की आणखी काही? फोटो पाहून थाई लोक पार येडे झाले

Thai Barber Shop Advertisement: केशकर्तनालयाची जाहिरात की आणखी काही? फोटो पाहून थाई लोक पार येडे झाले

Next

बँकॉक : दुकान किंवा आपली उत्पादनांचा खप वाढविण्यासाठी, ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी लोक काय काय जाहिराती करतील याचा नेम नाही. एका केशकर्तनालयाच्या मालकाने अशी जाहिरात केली आहे, ती पाहून लोक पार येडे झालेत. त्यांना कळतच नाहीय हे केशकर्तनालय आहे की थायी वेश्याव्यवसायाचा अड्डा. 

हे केशकर्तनालय थायलंडचेच आहे. नाखोन सावन सिटीमधील रियल कट 4 (Real Cur 4 Thai Barber Shop) या सलूनमालकाने जाहिरातीसाठी फेसबुकवर चार फोटो अपलोड केले आहेत. यामध्ये तोकडे कपडे घातलेल्या महिला पुरुषांसोबत दिसत आहेत. खुर्चीवर पुरुष बसलेले आहेत आणि ते खूप खूश दिसत असल्याचे या जाहिरातीत दाखविण्यात आले आहे. हे फोटो सलूनच्या प्रसिद्धीसाठी काढण्यात आले होते, परंतू लोकांचे ते वेगळ्याच गोष्टीसाठी लक्ष वळवत असल्याने सारेच त्रस्त झाले आहेत. 

सोशल मीडियावर या सलूनवरून वादाला तोंड फुटले आहे. अनेक युजरनी या सलूनला थायी वेश्यालय असल्याचे म्हटले आहे. एका युजरने विचारले की हे न्हाव्याचे दुकान आहे की मसाज पार्लर. एकाने म्हटले की, मी कालच या सलूनमध्ये केस कापून घेतले, लाज वाटतेय. या जाहिरातीने एवढा तांडव केला की मालकाला यावर स्पष्टीकरण द्यावे लागले आहे. 

दुकानाने फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे की, आमच्या पेजवर प्रसिद्ध झालेली जाहिरात पाहिल्यानंतर त्यांना मोठ्या प्रमाणात फोन कॉल आणि त्याबाबत चौकशी करण्यात आली आहे. आम्ही आमच्या सलूनमध्ये कोणत्या प्रकारची सेवा देतो याबद्दल काही गैरसमज असल्याचे दिसते. ते फक्त प्रमोशनल फोटोशूट होते. आमच्याकडे एक महिला आणि दोन पुरुष न्हावी आहेत. आपण या फोटोंमध्ये जे दिसत आहेत ते मॉडेल नसून दुकानाचेच मालक आहेत. 

Web Title: Thai Barber Shop Advertisement: After seeing the photos, the Thai people came mad over thai message or Brothel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.