Video : नाल्यात होता तब्बल 13 फुटांचा किंग कोब्रा; पकडण्यासाठी आले लोकं पण...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2019 03:04 PM2019-10-16T15:04:09+5:302019-10-16T15:06:55+5:30
साप हा शब्द जरी ऐकला तरिही अगदी घाबरून जायला होतं. मग किंग कोबरा तर पाहायलाच नको. पण एका नाल्यामध्ये चक्क 13 फुटांचा किंग कोब्रा सापडला आहे.
साप हा शब्द जरी ऐकला तरिही अगदी घाबरून जायला होतं. मग किंग कोबरा तर पाहायलाच नको. पण एका नाल्यामध्ये चक्क 13 फुटांचा किंग कोब्रा सापडला आहे. दक्षिण थायलंडमधील एका नाल्यामध्ये तब्बल 13 फुट लांबीचा किंग कोबरा आढळून आला आहे. थायलंडमधील बचाव दलाने मंगळवारी एक तासाच्या रेस्कूनंतर किंग कोबरा बाहेर काढला. बचाव दलाचं असं म्हणणं आहे की, त्यांनी आतापर्यंत एवढा लांब किंग कोबरा कधीच पाहिली नव्हता.
एएफपीने फोटेजच्या हवाल्याने सांगितलं की, बचाव दलाच्या एक सदस्याने अंधाऱ्या ड्रेनेज पाइपमध्ये लपलेल्या जगातील सर्वात विषारी सापाचा पाठलाग केला. कोबरा सतत पाण्यामध्ये लपत होता आणि पुन्हा पाइपमध्ये जाण्याचा प्रयत्न करत होता. परंतु, अथक प्रयत्नांनंतर त्याची शेपटी पकडून त्याला ताब्यात घेण्यात आलं.
न्यू यॉर्क पोस्टने दिलेल्या वृत्तानुसार, ज्या क्षेत्रामध्ये कोबरा दिसून आला तेथील सिक्यूरिटी गार्डने बचाव दलाला रविवारी याबाबत सूचना दिली होती. त्यानंतर 26 वर्षीय कृतकामॉन कांगखाइ यांनी सांगितल्यानुसार, 'माझ्यासोबत 7 अधिकारी तिथे होते'. त्यांनी हेदेखील सांगितले की, ज्या ठिकाणी कोब्रा सापडला त्या ठिकाणी आधी जंगल होतं.
कृतकामॉन यांनी सांगितलं की, कोबरा 13 फुट लांब होता आणि त्याचं वजन 15 किलो होतं. त्याचबरोबर त्यांनी हेदेखील सांगितलं की, हा जगभरातील तिसरा सर्वात लांब साप आहे. रेस्कू करण्यात आलेल्या सापाला नंतर जंगलात सोडण्यात आलं.
दरम्यान, दक्षिण पूर्व आशियामधील थायलँडमध्ये साप आणि कोबरा यांच्या विविध प्रजाती आढळून येतात. तेथील राहणाऱ्या नागरिकांसाठी साप फार डोकेदुखी आहे.