पठ्ठ्यानं कुत्रासमोर ठेवला नकली वाघ; अन कुत्र्यानं दिली 'अशी' जबरदस्त रिएक्शन, पाहा व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2020 03:57 PM2020-11-13T15:57:42+5:302020-11-13T15:57:56+5:30

Viral Video in Marathi : वाघाला कुत्र्यासमोर ठेवल्यानंतर कुत्र्याने जी रिएक्शन दिली ती पाहून अनेकांना हसू आले आहे.

Thailand youtuber pranking animals with a stuffed tiger toy video went viral gained millions of views | पठ्ठ्यानं कुत्रासमोर ठेवला नकली वाघ; अन कुत्र्यानं दिली 'अशी' जबरदस्त रिएक्शन, पाहा व्हिडीओ

पठ्ठ्यानं कुत्रासमोर ठेवला नकली वाघ; अन कुत्र्यानं दिली 'अशी' जबरदस्त रिएक्शन, पाहा व्हिडीओ

Next

थायलँडच्या एका युट्यूबरने नकली वाघाला समोर ठेवून कुत्र्यासोबत एक प्रँक केला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीसुद्धा हसून हसून लोटपोट व्हाल.  हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर लाखो लोकांनी कमेंट्स केल्या असून नेटिझन्सनी या व्हिडीओला पसंती दिली आहे. एका डमी वाघाला कुत्र्यासमोर ठेवल्यानंतर त्या कुत्र्याने जी रिएक्शन दिली ती पाहून अनेकांना हसू आले आहे.  कुत्राने  जेव्हा नकली वाघाला पाहिलं तेव्हा त्या कसलाही विचार न करता तिथून धूम ठोकली आहे.  त्याचप्रमाणे माकडंही वाघाला घाबरून  लांब पळालं आहे.

या व्हिडीओमध्ये प्रँक केल्यानंतर युट्यूबर  प्राण्यांची माफी मागत आहे. हा प्रँक व्हिडीओ युट्यूबरएंजेल नागा या चॅनेलवर अपलोड केला आहे. आतापर्यंत ४ लाखांपेक्षा जास्तवेळा हा व्हिडीओ पाहण्यात आला आहे. सोशल मीडियावर याप्रकारचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. 

हरवलेल्या कुत्र्यानं २६ दिवस पायपीट करत ६० किमी रस्ता केला पार

आपल्या हरवलेल्या मालकापर्यंत पोहोचण्यासाठी एका कुत्र्याने २६ दिवसात ६० किमीचा रस्ता पार केला आहे. ही घटना चीनमधील आहे. एक  कुटूंब फिरायला गेले असताना ते आपल्या कुत्र्याला विसरून आले. अशावेळी या कुत्र्यानं हिंमत न हारता मालकाला भेटण्यासाठी तब्बल  ६० किलोमीटरचा रस्ता पार केला आहे.
रिपोर्टनुसार चीनच्या हांगू येथे वास्तव्यास असलेले मिस्टर किऊ आणि त्यांचे कुटुंब एका प्रवासासाठी निघाले होते. मानलं गड्या! लॉकडाऊनमुळे पायलटची नोकरी गेली अन् आता युनिफॉर्मवरच विकताहेत नूडल्स

प्रवासादरम्यान ते एका ठिकाणी थांबले आणि आपल्या कुत्र्याला सोबत न्यायला विसरले. त्यामुळे Dou Dou नावाचा त्याचा कुत्रा मागे राहून गेला.  इतकं सगळं होऊनही कुत्र्यानं हार मानली नाही. जवळपास महिनाभर पायपीट करून कुत्रा अखेर मालकाच्या घरापर्यंत पोहोचला. हा कुत्रा Tong Lu Service station वर थांबला होता. 

या घटनेमुळे प्राणीतज्ज्ञ आणि कुत्र्याचे मालकही हैराण झाले होते. कुत्र्याला पाहिल्यानंतर त्या कुटूंबाचा आनंद  गगनात मावेनाासा झाला होता.  इतक्या दिवसांपासून बाहेर फिरत असल्यामुळे कुत्रा खूप कमकुवत आणि थकलेल्या अवस्थेत होता. शरीरावर  घाण, धुळीचे डाग पडले होते. समोर आलेल्या माहितीनुसार हा कुत्रा जवळपास ७ वर्षापासून 'कियू' यांच्यासोबत राहत होता. काय सांगता! योग्य व्यक्तीच्या शोधात महिलेने १० वेळा केली लग्ने, म्हणाली - भेटला नाही मिस्टर परफेक्ट...

Web Title: Thailand youtuber pranking animals with a stuffed tiger toy video went viral gained millions of views

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.