काही तासांमध्येच बनवून मिळतात Six-Pack Abs, जाणून घ्या अजब पद्धत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2019 02:50 PM2019-05-01T14:50:53+5:302019-05-01T14:56:16+5:30

बोटॉक्सचं इंजेक्शन एकीकडे लोकांना वृद्ध होऊ देत नाही तर दुसरीकडे प्लास्टिक सर्जरीच्या माध्यमातून चेहऱ्यात आणि शरीरात बदल केला जात आहे.

Thailands hospital offers instant six-pack abs and the process looks painful | काही तासांमध्येच बनवून मिळतात Six-Pack Abs, जाणून घ्या अजब पद्धत

काही तासांमध्येच बनवून मिळतात Six-Pack Abs, जाणून घ्या अजब पद्धत

googlenewsNext

चिकित्सा आणि तंत्रज्ञानाची विश्व जगभरात वेगळ्या उंचीवर पोहोचलं आहे. इथे काहीही शक्य आहे. बोटॉक्सचं इंजेक्शन एकीकडे लोकांना वृद्ध होऊ देत नाही तर दुसरीकडे प्लास्टिक सर्जरीच्या माध्यमातून चेहऱ्यात आणि शरीरात बदल केला जात आहे. लोकांमध्ये सिक्स-पॅक अ‍ॅब्सची वाढती क्रेझ पाहता थायलॅंडमधील एका हॉस्पिटलने यासाठीही सर्जरी सुरू केली आहे. म्हणजे काही वर्षे जिममध्ये घाम गाळण्यापेक्षा इथे काही तासांमध्ये सर्जरी करून तुम्हाला सिक्स अ‍ॅब्स मिळतील. 

बॅंकॉकच्या रुग्णालयाचं नाव मास्टरपीस हॉस्पिटल असं आहे. या हॉस्पिटलमध्ये abdominal etching नावाची एक सर्जरी केली जाते. या प्रक्रियेत तुमच्या पोटावर असलेली चरबी दूर केली जाते, जेणेकरून सिक्स-पॅक अ‍ॅब्स दिसावेत. या सर्जरीमध्ये कोणतंही प्लास्टिक किंवा सिलिकॉन इम्प्लांट केलं जात नाही. 

हॉस्पिटलचे सीईओ Raweewat “Sae” Maschamadol यांनी सांगितले की, 'आम्ही इम्प्लांट करत नाही, कारण ते चांगलं दिसत नाही आणि ते जास्त काळासाठी चालत नाही. ही सर्जरी आम्ही गेल्या तीन-चार वर्षांपासून करत आहोत. ज्या ठिकाणाहून आम्हाला २० ते ३० ग्राहक मिळतात तिथे आम्ही जातो'.

ते सांगतात की, या प्रक्रियेमध्ये व्यक्तीच्या पोटाच्या चारही बाजूने जमा झालेली चरबी दूर केली जाते. जेणेकरून खरे सिक्स अ‍ॅब्स बाहेर येतील. पहिल्यांदा टेक्सासच्या सर्जनने १९९० मध्ये अशी सर्जरी केली होती. सीईओंनी हेही सांगितले की, त्यांच्या हॉस्पिटलमध्ये जी सर्जरी केली जात आहे, ती जरा वेगळी आहे. यासाठी वेगवेगळ्या देशांमध्ये जाऊन अभ्यास करण्यात आला आणि त्यातून आम्ही आमची टेक्निक विकसित केली. 

या सर्जरीशी निगडीत फोटो आणि व्हिडीओज सोशल मीडियावर समोर आले आहेत. डॉक्टर सांगतात की, या सर्जरीने अजिबात वेदना किंवा त्रास होत नाही. डॉक्टर सांगतात की, अ‍ॅब्स बनवण्यासाठी येणारे ९० टक्के लोक हे फिटनेस प्रेमी असतात. 

मास्टर पीस हॉस्पिटलची सर्जरी आता चांगलीच व्हायरल झाली आहे. याचं कारण म्हणजे मॉडल ओमे पॅंगपार्नने नुकतेच या सर्जरीचे फोटो सोशल मीडियात शेअर केलेत. ओमे हा बऱ्याच महिन्यांपासून सिक्स पॅक अ‍ॅब्स तयार करण्याचा प्रयत्न करत होता. पण पोटावरील चरबी कमी होत नव्हती. तेव्हा त्याने प्लास्टिक सर्जरी केली. 

Web Title: Thailands hospital offers instant six-pack abs and the process looks painful

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.