चक्रीवादळात कार कागदाप्रमाणे उडून गेली; शहारे आणणारा Video व्हायरल...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2022 05:09 PM2022-11-21T17:09:57+5:302022-11-21T17:11:01+5:30

Viral Video: चक्रीवादळ कारला कागदाप्रमाणे उडवून घेऊन गेले, व्हिडिओ पाहून तुम्हालाही धडकी भरेल.

The car flew like paper in a hurricane; Shocking Video Viral... | चक्रीवादळात कार कागदाप्रमाणे उडून गेली; शहारे आणणारा Video व्हायरल...

चक्रीवादळात कार कागदाप्रमाणे उडून गेली; शहारे आणणारा Video व्हायरल...

Next

Trending Car Accident Video: जगात दररोज हजारो रस्ते अपघात होतात, त्यातील बहुतांश अपघात हे लोकांच्या निष्काळजीपणामुळे होतात. काही अपघातांमध्ये वाहनचालकाची चुकी नसेत, तर खराब हवामानाची चुकी असते. खराब हवामानात घराबाहेर पडू नये, अशा सूचना अनेकदा केल्या जातात. सध्या एका भीषण रस्ता अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये जोरदार वादळामुळे कार कागदाप्रमाणे हवेत उडताना दिसत आहे.

अनेक अपघातात चालकाला विचार करण्याची संधीही मिळत नाही. जोपर्यंत त्याला काही समजते, तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो. सध्या एका नैसर्गिक आपत्तीचा व्हिडिओ इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये एक कार चक्रीवादळात अडकते आणि अनियंत्रित होऊन अपघात होतो. निसर्गाचे रौद्र रूप दाखवणाऱ्या या व्हिडिओने सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे.

व्हिडिओ पहा:

कागदाप्रमाणे कार उडाली
हा अपघात किती भयंकर होता, हे व्हिडिओ पाहूनच कळेल. कार अपघाताचा हा व्हिडिओ पाहून तुमच्याही अंगावर शहारे येतील. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक भीषण चक्रीवादळात कार अडकते आणि काही सेकंदाच्या आत कार वादळासोबत नाहीशी होते. पाठीमागून येणाऱ्या कार चालकाने हा व्हिडिओ रेकॉर्ड केला आहे. 

व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
अपघाताचा हा व्हिडीओ पाहून अनेकजण नेटकरी चक्रावून गेले आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला 5 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. 14 सेकंदांच्या व्हिडिओवर लोकांनी लाखो कमेंट्सही केल्या आहेत. ड्रायव्हर काही वेळ थांबला असता, तर हा अपघात टाळता आला असता, असे मत अनेकांनी व्यक्त केले.

Web Title: The car flew like paper in a hurricane; Shocking Video Viral...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.