फॅक्ट चेक - पाेस्टमास्तर पदासाठी चालवावी लागते अशी सायकल... खरंच?
By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2024 09:21 AM2024-02-05T09:21:43+5:302024-02-05T09:22:18+5:30
असा दावा या व्हिडीओतून करण्यात आला आहे.
पाण्यात एका अगदी अरुंद आणि नागमोडी रॅम्पवरुन एक सायकलस्वार सायकल चालवित जात असल्याचा व्हिडीओ साेशल मीडियावर व्हायरल झाला आहे. भारतात पाेस्टमास्तर अशा पद्धतीने निवडण्यात येतात, असा दावा या व्हिडीओतून करण्यात आला आहे. मात्र हा व्हिडीओ खोटा आहे.
पाेस्टमास्तर निवडीच्या चाचणीचा हा व्हिडीओ नसून ताे नेपाळमधील एका स्पर्धेचा आहे. नेपाळमध्ये कपिलवास्तू या जिल्ह्यात सायकल प्लॅंक बॅलेंस स्पर्धेचा हा व्हिडीओ असून त्यात एका ठिकाणी नेपाळचा राष्ट्रध्वजही दिसून येताे. भारतात टपाल खात्यातील नाेकरभरतीसाठी लेखी परीक्षा घेण्यात येते. त्यानंतर अंतिम यादी जाहीर हाेते. याशिवाय शैक्षणिक व इतर निकषही आहेत. अशा पद्धतीने सायकल चालवून चाचणी घेतली जात नाही.