बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2024 07:26 PM2024-11-27T19:26:03+5:302024-11-27T19:28:35+5:30
The Great Khali : या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
The Great Khali : 'द ग्रेट खली'ची गणना जगातील सर्वात उंच आणि शक्तीशाली लोकांमध्ये केली जाते. WWE मध्ये द ग्रेट खलीने मोठमोठ्या पैलवानांना सलो की पळो करुन सोडलं आहे. खली नुकताच बागेश्वर धामवाल्या धीरेंद्र शास्त्री यांच्या पदयात्रेत सहभागी झाला होता. यावेळी त्याने मस्करीत चक्क एका माणसाला केसांनी पकडून एका हाताने हवेत उचलले. हे पाहून बागेश्वर बाबांनाही हसू आवरता आले नाही. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
बागेश्वर धामचे पीठाधीश्वर पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी 9 दिवसीय 'सनातन हिंदू एकता' पदयात्रा काढली आहे. संजय दत्तपासून ते द ग्रेट खलीपर्यंत...अनेक दिग्गजांनी त्यांच्या पदयात्रेत सहभाग घेतला आहे. या पदयात्रेच्या पाचव्या दिवशी, 25 नोव्हेंबरला द ग्रेट खली पदयात्रेत सामील झाला. खलीला पाहण्यासाठी तिथे अनेकांनी गर्दी केली होती. यावेळी लोकांच्या विनंतीवरुन खलीने एका साधूला केसांनी पकडून हवेत उचलले.
खली ने यात्रा में शामिल एक साधु की चोटी पकड़कर उन्हें एक हाथ से उठाया । #Khali#bageshwardham#ViralVideopic.twitter.com/QTxHNPBJw6
— ITM MEDIA 24 (@itmmedia24) November 26, 2024
हे दृश्य पाहून बागेश्वर बाबांनाही हसू आवरता आले नाही. खलीची ताकद पाहून जवळ उभे असलेले लोकही टाळ्या वाजवतात आणि जोरात 'जय श्री राम'च्या घोषणा देऊ लागतात. दरम्यान, खलीने ज्या व्यक्तीला हवेत उछलले, त्याला बुंदेलखंड किंवा दमोहचा खली म्हणतात. त्याच्या फेसबुक प्रोफाइलनुसार तो स्वत:ला स्टंटमॅन आणि बद्री बाबा म्हणवतो. हा व्हिडिओ X वर @itmmedia24 नावाच्या अकाउंटवरुन पोस्ट केला आहे.