Video: दिवाळीत फुटला सर्वात मोठा गल्ला; कटरने सिलेंडर कट करताच १० रुपयांच्या नाण्यांचा ढीग
By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2023 02:41 PM2023-11-08T14:41:06+5:302023-11-08T14:42:44+5:30
साठवलेली नाणी बाहेर काढण्यासाठी चक्क हे सिलेंडर इलेक्ट्रीक कटरच्या सहाय्याने कट करण्यात आलं आहे.
सोशल मीडियामुळे अनेकांच्या अनेक तऱ्हा लोकांपर्यंत पोहोचत आहेत. लहान-सहान क्रिएटीव्ह कामंही व्हिडिओच्या माध्यमातून समोर येतात. तर, अनेकदा इन्कम टॅक्स अधिकाऱ्यांनी एखाद्या ठिकाणी धाड टाकल्यानंतर लपवलेले पैसेही कुठून बाहेर येतील हे सांगता येत नाही. त्याचप्रकारचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामध्ये, चक्क सिलेंडरच्या टाकीमध्ये १० रुपयांची नाणी साठवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे ही साठवलेली नाणी बाहेर काढण्यासाठी चक्क हे सिलेंडर इलेक्ट्रीक कटरच्या सहाय्याने कट करण्यात आलं आहे.
चिल्लर पैसे साठवण्यासाठी लहानपणी गल्ला वापरला जात, या गल्ल्यात काही रक्कम साठल्यानंतर किंवा हा मातीचा गल्ला भरल्यानंतर तो फोडून त्यातील पैसे बाहेर काढण्यात येत. दिवाळीच्या सुट्टीत नेहमी हा अनुभव अनेक घरांमध्ये दिसून येतो. मात्र, चक्क गॅस सिलेंडरच्या टाकीत १०-१० रुपयांची नाणे साठवण्यात आल्याचा व्हिडिओ पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. तसेच, अनेकांना प्रश्नही पडला आहे की, नेमकं सिलेंडरमध्ये नाणी टाकली कुठून?. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडिओवर कमेंट करुन नेटीझन्स मजा घेत आहेत.
tusharghongade1234 या इंस्टाग्राम अकांउटवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. ''जर चुकीचा सिलेंडर कापला असता तर…'', असं कॅप्शन या इंस्टा अकाऊंटवरुन लिहिण्यात आलं आहे. या व्हिडिओवर एकाने कमेंट करुन, ''२०२३चा सर्वात मोठा गल्ला'', असं लिहिलं आहे. तसेच, इन्कम टॅक्स विभागाला कळवले पाहिजे, अशी मजेशीर कमेंटही एक युजर्सने केली आहे. तर, यात पैसे टाकले कसे?, असा प्रश्नही एका युजरला पडला आहे.