पॅराशुटची दोरी तुटली अन् आकाशातून खाली कोसळले तीघेजण, पुढे जे घडलं ते धक्कादायक
By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2022 06:57 PM2022-05-25T18:57:14+5:302022-05-25T18:58:33+5:30
एक घटना दमनमधील जंपोर येथून समोर आली आहे. येथील समुद्राजवळ पॅरासेलिंगदरम्यान एका अपघातात तिघेजण गंभीर जखमी झाले.
आजकाल एडव्हेंचर करणं फॅशन बनलं आहे. त्यातून अनेक पर्यटनस्थळी पॅराग्लाइडिंग, पॅरासेलिंग, वोटिंग यांची सुरुवात करण्यात आली आहे. मात्र अनेकदा यातून भयंकर अपघात घडू शकतो. अशीच एक घटना दमनमधील जंपोर येथून समोर आली आहे. येथील समुद्राजवळ पॅरासेलिंगदरम्यान एका अपघातात तिघेजण गंभीर जखमी झाले.
पॅरासेलिंग करीत असताना तीन पर्यटक तब्बल १०० फुटावरुन खाली पडले. यात ते गंभीर जखमी झाले आहेत. या दुर्घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात तीन पर्यटक पॅराशूटवरुन टेक ऑफ केल्याच्या काही सेकंदात जमिनीवर कोसळतात. या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, पॅरोशूटची रश्शी एका बाजूने निघाली, त्यामुळे नियंत्रण गमावल्याने तिघे खाली पडले.
साधारण 30 सेकंदाच्या या व्हिडीओत पर्यटक या एडव्हेंचरसाठी खूप उत्साही होते. तिघेही पॅराशूटसह वर उडतात. यानंतर हवेच्या दबावामुळे पॅरोशूट टर्न होतं. यानंतर तिघेही जमिनीवर कोसळतात. तिघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
@VisitDiu@DiuTourismUT@DiuDistrict@VisitDNHandDD
— Rahul Dharecha (@RahulDharecha) November 14, 2021
Parasailing Accident,
Safety measures in India,
and they said very rudely that this is not our responsibility. Such things happens. Their response was absolutely pathetic.#safety#diu#fun#diutourism#accidentpic.twitter.com/doN4vRNdO8