अंतराळातून पृथ्वीवर होत असलेल्या 'सूर्योदया'चा अलौकिक नजारा, व्हिडीओ बघून व्हाल थक्क!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2024 01:20 PM2024-10-03T13:20:58+5:302024-10-03T13:21:49+5:30
Viral Video : सोशल मीडियावर अंतराळातून सूर्योदय कसा दिसतो, हे दाखवणारा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. व्हिडिओत हा मनमोहक नजारा पाहून लोक थक्क झाले आहेत.
Viral Video : सूर्योदय आणि सूर्यास्ताचा अद्भुत नजारा बघण्यासाठी लोक वेगवेगळ्या ठिकाणी भेट देतात. अंतराळातून सूर्योदय आणि सूर्यास्त बघणं हा कदाचित जगातील सगळ्यात अद्भुत नजारा ठरू शकतो. हेच लोकांचं स्वप्न आता पूर्ण झालं आहे. सोशल मीडियावर अंतराळातून सूर्योदय कसा दिसतो, हे दाखवणारा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. व्हिडिओत हा मनमोहक नजारा पाहून लोक थक्क झाले आहेत.
व्हिडिओत दाखवण्यात आलं आहे की, कशाप्रकारे पृथ्वीवर सूर्याचा प्रकाश पसरत जात आहे. सूर्याची पहिली किरण वायुमंडलाला स्पर्शून निळा आणि केशरी नजारा तयार करते. सोबतच पांढरे ढगही दिसत आहेत. हा नजारा इतका सुंदर आहे की, जणू स्वर्गातील नजारा आहे. लोकांच्या मनाला हा व्हिडीओ इतकी शांतता देत आहे की, लोक पुन्हा पुन्हा हा व्हिडीओ बघत आहेत.
The long shadows of sunrise seen from space. pic.twitter.com/1C4YWQ6OOR
— Wonder of Science (@wonderofscience) September 26, 2024
सोशल मीडियावर प्लॅटफॉर्म 'एक्स'वर शेअर करण्यात आलेल्या या व्हिडिओने सगळ्यांनाच मनमोहित केलं आहे. लाखो लोकांनी हा व्हिडीओ पाहिलाय. तसेच शेकडो लोकांनी यावर प्रतिक्रिया देऊन या अनुभवाबाबत सांगितलं आहे. बऱ्याच लोकांनी नजारा स्वर्गातील असल्याचं म्हटलं आहे.
हा व्हिडीओ @wonderofscience अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून अनेक लोकांची अंतराळातून पृथ्वी बघण्याची ईच्छा पूर्ण झाली आहे. हा व्हिडीओ त्यांना आनंद देणारा ठरत आहे. मात्र, या व्हिडिओत करण्यात आलेल्या दाव्याची पुष्टी लोकमत करत नाही.