Year ender 2024 : यावर्षी Gen Z शब्दाचा खूप झाला वापर, जाणून घ्या काय आहे याचा अर्थ!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2024 10:26 IST2024-12-17T10:26:19+5:302024-12-17T10:26:49+5:30
Gen Z हा शब्द सोशल मीडियावर, बॉलिवूडमध्ये आणि फॅशन वर्ल्डमध्ये ट्रेन्ड राहिला. पण अजूनही अनेकांना या शब्दाचा अर्थ माहीत नाही आणि हा कशासाठी वापरला जातो हेही माहीत नाही. अशात याचा अर्थ आज आम्ही सांगणार आहोत.

Year ender 2024 : यावर्षी Gen Z शब्दाचा खूप झाला वापर, जाणून घ्या काय आहे याचा अर्थ!
What is meaning of Gen Z : 2024 हे वर्ष आता सरत चाललं आहे. काही दिवसांमध्ये नव्या वर्षाला सुरूवात होईल. अशात लोक 2024 मध्ये झालेल्या घटनांची आठवण काढत आहेत. या वर्षात एका शब्दाचा भरपूर वापर झाला तो म्हणजे Gen Z. हा शब्द सोशल मीडियावर, बॉलिवूडमध्ये आणि फॅशन वर्ल्डमध्ये ट्रेन्ड राहिला. पण अजूनही अनेकांना या शब्दाचा अर्थ माहीत नाही आणि हा कशासाठी वापरला जातो हेही माहीत नाही. अशात याचा अर्थ आज आम्ही सांगणार आहोत.
कोणत्या लोकांसाठी वापरला जातो हा शब्द?
Gen Z अशा लोकांना म्हटलं जातं ज्यांचा जन्म 1997 ते 2012 दरम्यान झाला आहे. ही पीढी Millennials च्या नंतरची आहे आणि इंटरनेट, सोशल मीडिया आणि डिजिटल टेक्नॉलॉजीसोबत मोठे झालेत.
Gen Z हे असे लोक आहेत जे जन्मानंतर सोशल मीडिया, इंटरनेटवर अॅक्टिव आहेत. या पीढितील लोक वर्तमानात सगळ्यात जास्त सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहेत. हे लोक लवकर पैसे कमावणे आणि पैशांची बचत करणे यावर भर देतात.
तसेच या पीढिला फिरण्याची खूप आवड आहे. त्याशिवाय या जनरेशनमधील लोक गेमिंगकडे एका खेळापेक्षा अधिक वेगळ्या दृष्टीने बघते. ही पीढी नव्या गोष्टी लगेच आत्मसात करते. इतकंच नाही तर या पीढितील लोक क्रिएटिव्हिटीवर फोकस करतात आणि प्रेझेंटेशन स्किलचा महत्व देते.
Gen Z लोक मल्टीटास्किंगवर फोकस करतात. अनेक गोष्टी एकत्र करण्यावर त्यांचा भर असतो. जसे की, व्हिडीओ बघणे, चॅट करणे आणि काम करणे. ही पीढी मानसिक आणि शारीरिक आरोग्याबाबतही फार सहग असते.
जनरेशनचे प्रकार आणि त्यांची नावे
1) सायलेंट जनरेशन
1928 ते 1945 दरम्यान जन्माला आलेल्या लोकांना सायलेंट जनरेशनमधील म्हटलं जातं.
2) बेबी बूमर्स
1946 ते 1964 दरम्यान जन्मलेल्या लोकांना बेबी बूमर्स म्हणतात.
3) जनरेशन X
1965 ते 1980 दरम्यान जन्माला आलेल्या लोकांना जनरेशन एक्स म्हटलं जातं.
4) मिलेनियल्स / जनरेशन Y
1981 ते 1996 दरम्यान जन्मलेल्या लोकांसाठी जनरेशन वाय वापरलं जातं.
5) जनरेशन Z
1997 ते 2012 दरम्यान जन्मलेल्या लोकांसाठी जनरेशन झी वापरला जातो.
6) जनरेशन अल्फा
2013 से वर्तमानातील लोकांना जनरेशन अल्फा म्हटलं जातं.