वा रे पठ्ठे...! तरुणानं थेट महिंद्रा Thar लाच जोडला रोटाव्हेटर, शेतातही फिरवला; पाहा दमदार VIDEO

By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2023 10:29 AM2023-03-01T10:29:16+5:302023-03-01T10:35:43+5:30

या व्हडिओमध्ये दिसत आहे की, संबंधित तरुणाने थारला रोटाव्हेटर जोडला आहे आणि तो बिंधास्तपणे संपूर्ण शेतातून फिरवत आहे.

The young man attached the rotavator directly to the Mahindra Thar, also rotated it in the field watch instagram video | वा रे पठ्ठे...! तरुणानं थेट महिंद्रा Thar लाच जोडला रोटाव्हेटर, शेतातही फिरवला; पाहा दमदार VIDEO

वा रे पठ्ठे...! तरुणानं थेट महिंद्रा Thar लाच जोडला रोटाव्हेटर, शेतातही फिरवला; पाहा दमदार VIDEO

googlenewsNext

'महिंद्रा थार' ही एक अत्यंत शक्तिशाली आणि रफ अँड टफ गाडी आहे. मात्र एका तरुणाने थारचा वापर 'ट्रॅक्टर' सारखाही करून दाखवला आहे. याचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत असून चर्चेचा विषय बनला आहे. 

हो, हा व्हिडिओ पाहून अनेक युजर्सनी आश्चर्य व्यक्त केले  आहे. याच बरोबर, असे करशील तर लोक महिंद्राचे ट्रॅक्टर खरेदी करणं बंद करतील, असेही काही युजर्सनी म्हटले आहे. या व्हडिओमध्ये दिसत आहे की, संबंधित तरुणाने थारला रोटाव्हेटर जोडला आहे आणि तो बिंधास्तपणे संपूर्ण शेतातून फिरवत आहे.

हा व्हडिओ गेल्यावर्षी जिसेंबर महिन्यात इंस्टाग्रामवर arunpanwarx ने पोस्ट केला होता. या व्हडिओला आतापर्यंत जवळपास 32 हजार हून अधिक लाइक्स मिळाले आहेत. खरे तर हा व्हडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर, अनेक युजर्सनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. एकाने लिहिले, असे कराल तर लोक महिंद्राचे ट्रॅक्टर खरेदी करणेच बंद करतील आमि थारच्या सहाय्यानेच शेती करतील. 

आणखी एकाने लिहिले, अरे भावा थारला ट्रॅक्टर केलंस. काही युजर्सनी लिहिले, थारचे इंडिनही म्हणत असेल, 'बच्चे की जान लोगे क्या?' याशिवाय या तरुणाने केलेला जुगाड अनेक युजर्सना अत्यंत आवडला आहे. 
 

Web Title: The young man attached the rotavator directly to the Mahindra Thar, also rotated it in the field watch instagram video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.