वायुसेनेच्या Hell's Angels चा फोटो व्हायरल, ऐतिहासिक फोटोचं रिक्रिएशन!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2019 05:07 PM2019-04-29T17:07:45+5:302019-04-29T17:12:38+5:30
गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक फोटो वेगाने व्हायरल होत आहे. हा फोटो फार जुना असून यात भारतीय वायुसेनेचे ५ पायलट मोटारसायकलवर बसून पोज देत आहेत.
गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक फोटो वेगाने व्हायरल होत आहे. हा फोटो फार जुना असून यात भारतीय वायुसेनेचे ५ पायलट मोटारसायकलवर बसून पोज देत आहेत. हा फोटो १९६६ मधील आहे आणि हा फोटो अजिबात सामान्य नाहीये.
हा फोटो काही दिवसांपूर्वी Reddit आणि Twitter वर खूप बघितला गेला आणि शेअर केला गेला. या फोटोचा ५३ वर्ष जुना इतिहास आहे. हा फोटो ट्विटरवर महिंद्रा कंपनीचे प्रमुख आनंद महिंद्रा यांनी ट्विट केला आहे. या फोटोत दिसणारे पायलट हे 'Hell's Angel's' ग्रुपचे आहेत.
Do you know who these gentlemen in the pics are? The answer may be in your #whatsappwonderboxpic.twitter.com/TDxfuH534D
— anand mahindra (@anandmahindra) April 28, 2019
खास बाब म्हणजे म्हणजे या पायलट्सनी ५३ वर्षांनंतर २०१९ मध्ये पुन्हा तसाच फोटो काढला. पण यात नव्या फोटोमध्ये केवळ ४ पायलट दिसत आहेत. आनंद महिंद्रा यांनी हा फोटो शेअर करत विचारले की, 'काय तुम्हाला माहीत आहे या फोटोतील जंटलमन कोण आहेत?'.
Reddit वर एका यूजरने लिहिले की, हा फोटो १९७१ च्या युद्धाच्या आधीचा आहे. पायलट्स जावा मोटारसायकलवर बसले आहेत. या पायलट्सनी त्यावेळी पाकिस्तानवरून विमान उडवले होते आणि लढाई लढली होती. असे सांगितले जात आहे की, जावा मोटारसायकलने रिलॉन्च केलं आहे. त्यामुळे या ऐतिहासिक फोटोला पुन्हा रिक्रिएट करण्याचा प्रयत्न केला. कंपनीनेच चारही पायलट्सचा शोध घेतला आणि हा नवा फोटो क्लिक केला.
— Param Patel (@Patel_p3) April 28, 2019
ट्विटरवरही एका यूजरने फोटोबाबतचा एक किस्सा शेअर करत सांगितले की, या ऐतिहासिक पायलट्सच्या ग्रुपला 'Hell's Angel's' नाव देण्यात आलं होतं.