या फोटोत लपली आहे एक मुलगी, शोधून शोधून थकले पण ती काही सापडेना; बघा तुम्ही ट्राय करून!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2022 06:27 PM2022-03-28T18:27:51+5:302022-03-28T18:31:52+5:30

Optical Illusion Viral Photo : या फोटोत एक मुलगी लपली आहे. पण तिला सहजासहजी शोधता येत नाही. मात्र, प्रयत्न केले तर शोधणं थोडं सोपं होईल. जरा बारकाईने बघा तुम्हालाही ती मुलगी दिसेल. 

There is a girl hidden in this picture can you find it? | या फोटोत लपली आहे एक मुलगी, शोधून शोधून थकले पण ती काही सापडेना; बघा तुम्ही ट्राय करून!

या फोटोत लपली आहे एक मुलगी, शोधून शोधून थकले पण ती काही सापडेना; बघा तुम्ही ट्राय करून!

Next

Optical Illusion Viral Photo : सोशल मीडियावर रोजच हजारो फोटो व्हायरल होत असतात. यातले काही फोटो सुखावणारे तर काही फोटो पोट धरून हसायला लावणारे असतात. तर काही फोटो असेही असतात जे डोकं चक्रावून सोडतात. असाच एक फोटो सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. फोटोही तसाच खास आहे. या फोटोत एक मुलगी लपली आहे. पण तिला सहजासहजी शोधता येत नाही. मात्र, प्रयत्न केले तर शोधणं थोडं सोपं होईल. जरा बारकाईने बघा तुम्हालाही ती मुलगी दिसेल. 

महत्वाची बाब म्हणजे बारकाईने जर पाहिलं तर मुलगी तुमच्या डोळ्यांसमोरच आहे. फक्त जरा शांतपणे आणि डोळे उघडे ठेवून काळजीपूर्वक बघावं लागेल. तरी दिसली नाही तर फोटो थोडा झूम करून बघा. बरेचजण याकडे फोटोकडे एकटक तासंतास बघत आहेत. पण त्यांना समोरच असलेली मुलगी दिसत नाही. लोक तर हा फोटो त्यांच्या मित्रांना पाठवून मुलगी शोधण्याचं चॅलेंज देत आहेत. 

जर सगळं करून झाल तरी तुम्हाला फोटोत लपलेली मुलगी दिसत नसेल तर आम्ही तुम्हाला एक हिंट देतो. मुलगी झाडाजवळ कुठेतरी आहे. आता इतकी हिंट दिल्यावर तुम्हाला मुलगी शोधायला सोपं होईल.

बऱ्याच जणांनी प्रयत्न केले तर त्यांना मुलगी दिसली, पण जास्तीत जास्त लोकांना ती सहजपणे दिसली नाही. बघा तुम्हाला तरी सापडते का...
 

Web Title: There is a girl hidden in this picture can you find it?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.