२०२४ मध्ये घडणार 'या' ४ भयानक घटना! बाबा वेंगांच्या नव्या भविष्यवाणीने सगळ्यांनाच भीती
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2023 06:33 PM2023-11-28T18:33:26+5:302023-11-28T18:34:01+5:30
२०२४ साठी बाबा वेंगांच्या नवीन भविष्यवाणी आजकाल खूप चर्चेत आहेत.
वर्ष संपत आले की नवीन वर्षाच्या भविष्यवाणीची चर्चा सुरू असते. २०२३ हे वर्ष संपत आले आहे. २०२४ च्या भविष्यवाणीची जोरदार चर्चा सुरू आहे, बाबा वेंगा यांच्या आतापर्यंत अनेक भविष्यवाणी खऱ्या ठरल्या आहेत. २०२४ साठीही त्यांनी मोठ्या भविष्यवाणी केल्या आहेत, बाबा वेंगा यांचे अंदाज अनेक वेळा खरे ठरले आहेत. ते आता या जगात नसले तरी त्यांनी केलेली भविष्यवाणी चर्चेत असते.
सौदी अरेबियातील परदेशी कामगारांसाठी बदलला 'हा' नियम, भारतावर काय परिणाम होणार?
अहवानुसार, बाबा वेंगा यांनी कथितरित्या ९/११ च्या दहशतवादी हल्ल्याची आणि स्वतःच्या मृत्यूची भविष्यवाणी केली होती. त्यांना ‘बाल्कनचा नॉस्ट्राडेमस’ म्हणूनही ओळखले जाते. बल्गेरियातील बाबा वेंगा यांचे खरे नाव वंगेलिया पांडेवा गुश्तेरोवा आहे. १९९६ मध्ये वयाच्या ८४ व्या वर्षी त्यांचे निधन झाले.
१९८० मध्ये, बाबा वेंगा यांनी रशियाच्या कुर्स्क शहरात एका भयानक घटनेची भविष्यवाणी केल्याचा दावा केला. पाण्याखाली एखादी घटना घडेल आणि संपूर्ण जग त्यावर रडणार असल्याचा दावा त्यांनी केला होता. ऑगस्ट २००० मध्ये त्यांची भविष्यवाणी खरी ठरल्याचे सांगितले जाते. शहराजवळ आण्विक पाणबुडी बुडाल्याने एकूण १८८ क्रू मेंबर्सांचा मृत्यू झाला. याशिवाय १९८९ मध्ये त्यांनी ९/११ च्या हल्ल्याबाबतही भाकीत केले होते आणि म्हटले होते की, 'अमेरिकेवर पोलादी पक्ष्यांचा हल्ला होईल, ज्यात जुळी मुले पडतील. निष्पाप लोक रक्तस्त्रावात पडले असतील. असे म्हटले जाते की स्टील बर्ड्सद्वारे त्याचा अर्थ हल्ल्यात वापरण्यात आलेली विमाने होती.
२०२४ साठी भविष्यवाणी काय?
बाबा वेंगा यांनी २०२४ साठी काही आश्चर्यकारकपणे भीतीदायक भविष्यवाणी केली आहे. २०२४ मध्ये रशियाच्या राष्ट्राध्यक्षांची त्यांच्याच देशातील कोणीतरी हत्या करेल. याशिवाय २०२४ मध्ये युरोपमध्ये दहशतवादी हल्ला करतील, असा अंदाजही त्यांनी वर्तवला आहे. बाबा वेंगा यांचा दावा आहे की, 'मोठा देश' पुढील वर्षी जैविक शस्त्रांची चाचणी किंवा हल्ला करेल. पुढील वर्षी मोठे आर्थिक संकट येणार असून त्याचा परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेवर होणार आहे, अशी भविष्यवाणी बाबा वेंगा यांनी केली आहे.