'या' श्वानांनी ७ वर्षे केली देशाची सेवा, आता त्यांना आहे तुमची गरज!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2019 05:12 PM2019-04-16T17:12:30+5:302019-04-16T17:18:02+5:30
भारताची असो वा आणखी कोणत्याही देशाची सुरक्षा व्यवस्था असो यात श्वान फार महत्त्वाची भूमिका बजावतात.
भारताची असो वा आणखी कोणत्याही देशाची सुरक्षा व्यवस्था असो यात श्वान फार महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यांची हुंगण्याची क्षमता आपल्या फार कामी येते. त्यांच्या या गुणामुळे ते देशाच्याही कामात येतात. सध्या एक ट्विट व्हायरल होत आहे. यात सांगण्यात आलं आहे की, ज्या श्वानांनी ७ वर्ष देशाची सेवा केली, त्यांना तुम्ही दत्तक घेऊ शकता.
These dogs have served the Nation for seven years, now age catching. You can adopt them and give them a loving home. All you need to do is submit an affidavit.
— Rohit Agarwal 🇮🇳 (@ragarwal) April 16, 2019
Write to Comdt RVC Centre & College, Meerut Cantt, Meerut - 250001
Courtesy @Ranteej_Kolwat@adgpipic.twitter.com/086FDXYkIs
रोहित अग्रवाल नावाच्या व्यक्तीने हे ट्विट केलं आहे. त्यांनी लिहिले की, 'या श्वानांनी देशाला ७ वर्ष दिली. आता ते म्हातारे झाले आहेत. हवं तर तुम्ही यांना दत्तक घेऊ शकता आणि एक घर देऊ शकता. यासाठी तुम्हाला केवळ एक अॅफिडेविट करावं लागेल आणि Comdt RVC Centre & College, College, Meerut Cantt, Meeru - 250001 या पत्त्यावर पाठवायचं आहे.
God bless the Indian army. Sir, I might not be able to adopt (due to some personal compulsions) but is there a way to contribute financially, on a regular basis?
— pmanish 🇮🇳 (@pmanish) April 16, 2019
They are beautiful animals who do. Both my dogs are adopted. One was adopted when she was five years old. All they need is a little bit of love and affection to give you unconditional love
— Snehesh Alex Philip (@sneheshphilip) April 16, 2019
Sir I want to adapt one of them can you guide me how to get through the process please sir so fond of them
— Sai Teja (@1693f7287dbc47d) April 16, 2019
लोक हे ट्विट पाहून चांगलेच भावूक झाले आहेत. अनेकांनी श्वान दत्तक घेण्याची तयारीही दर्शवली आहे. तर अनेकांनी भावूनक संदेशही ट्विट केले आहेत. आता घरात श्वान पाळण्याची अनेकांची इच्छा असते. त्यात अशाप्रकारचे देशाची सेवा करणारे श्वान पाळण्याची संधी असेल तर ही संधी अनेकजण घेऊ शकतात.