कोणत्याही उपकरणांशिवाय केवळ साडी नेसून समुद्रात उतरतात 'या' महिला, तेव्हा मिळतं दोन वेळचं जेवण!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2019 02:07 PM2019-02-07T14:07:05+5:302019-02-07T14:15:40+5:30
तुम्ही कधी नदी किंवा गावातील तलावात उडी घेतली असेल तर तुम्हाला माहीत असेल की, पाण्याच्या आत श्वास रोखून ठेवणे किती कठीण काम असतं.
तुम्ही कधी नदी किंवा गावातील तलावात उडी घेतली असेल तर तुम्हाला माहीत असेल की, पाण्याच्या आत श्वास रोखून ठेवणे किती कठीण काम असतं. त्यात जास्तीत जास्त लोक हे कमी कपड्यात पाण्यात पोहोयला जातात. पण एका ठिकाणी काही महिला कोणत्याही उपकरणांशिवाय समुद्रात उड्या घेतात आणि आपलं पोट भरतात.
तामिळनाडूनच्या रामेश्वरमपासून काही अंतरावर एक मन्नार द्वीप आहे. या परिसरातील महिला समुद्रात जातात. त्या समुद्रातून Seaweed काढून आणतात. जेणेकरून हे विकून त्यांना पोट भरता येईल. आश्चर्याची बाब म्हणजे या महिला हे काम कोणत्याही उपकरणांशिवाय करतात.
दोन पत्रकारांनी या महिलांचा हा कारनामा सोशल मीडियात शेअर केलाय. त्यांनी सांगितले की, या महिलांच्या टीममध्ये २० वर्षांपासून ते ७० वर्षांच्या महिलांचा समावेश आहे. एक ७० वर्षांची आजीही यात आहेत. त्या १३ वर्षांच्या असतानापासून हे काम करत आहेत.
@NehaSharma_BBC and I travelled to southern Indian state of Tamil Nadu to film the women, who dive into the sea to collect seaweed, which helps them to support their families. pic.twitter.com/duX4uxqV6O
— Aamir Peerzada (@AamirPeerzadaa) February 5, 2019
This village head and the leader of seaweed collection association greeted us with the locally made garlands. How happy @NehaSharma_BBC looks. 😊 pic.twitter.com/VBqSjZnKub
— Aamir Peerzada (@AamirPeerzadaa) February 5, 2019
या महिलांना महिन्याला जवळपास ८ ते ९ हजार रूपये मिळतात. यातूनच त्या त्यांच्या मुलांचा आणि पोटापाण्याचा खर्च भागवतात. या ठिकाणी चारही बाजूने समुद्र असल्या कारणाने समुद्र हेच त्यांचं दुकान आहे. त्यांच्याकडे करण्यासाठी दुसरं कामही नाहीये.
Seaweed ला इथे खरपतवार असंही म्हटलं जातं. हे फार महाग विकलं जातं. ही वनस्पती समुद्रातील दगडांमध्ये आढळते. या वनस्पतीमध्ये Carrageenan असतं. याचा वापर वेगवेगळ्या आइस्क्रीम, कस्टर्ड पावडर आणि कॉस्मेटिक प्रॉडक्टमध्ये केला जातो.