California Wildfires: कॅलिफोर्नियातील अग्निकल्लोळाचे थरकाप उडवणारे व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2018 01:21 PM2018-11-22T13:21:11+5:302018-11-22T13:26:02+5:30
अमेरिकेच्या उत्तर कॅलिफोर्नियामध्ये आगीने हाहाकार माजला असून आतापर्यंत यात ८१ लोकांचा होरपळून मृत्यू झाला आहे.
(Image Credit : www.usnews.com)
अमेरिकेच्या उत्तर कॅलिफोर्नियामध्येआगीने हाहाकार माजला असून आतापर्यंत यात ८१ लोकांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर ९०० पेक्षा जास्त लोक अजूनही बेपत्ता असल्याचे सांगितले जात आहे. अमेरिकेच्या इतिहासातील आतापर्यंतची ही सर्वात मोठी आग मानली जात आहे.
ही आग इतक्या वेगाने पसरत असून यात १५ हजारपेक्षा जास्त घरे जळून खाक झाली आहेत. तर २ लाख एकरच्या जवळपास जमिन या आगीत जळून खाक झाली आहे.
Small church survived in #campfire at #Paradise#CalFire#wildfire#ButteCounty#ParadiseCa#ParadiseFirespic.twitter.com/LghJ4mOa0P
— Aleksandr Yarmolatii (@sanextv) November 11, 2018
कॅलिफोर्नियाचं प्रशासन या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करीत आहे. आजूबाजूच्या परीसरात इतकं प्रदुषण झालं आहे की, इथे कृत्रिम पाऊसही पाडला जात आहे.
कॅलिफोर्नियाच्या जंगलामध्ये दरवर्षी आग लागते. जंगलात वाढणारं तापमान याचं मुख्य कारण सांगितलं जातं. मनुष्यांकडून करण्यात आलेल्या कचऱ्यामुळे ही आग अधिक पसरते.