'करावे तसे भरावे'! दुकान लुटायला आलेल्या चोराची कार चोरीला, व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2019 12:03 PM2019-08-28T12:03:15+5:302019-08-28T12:08:46+5:30
'करावे तसे भरावे' ही म्हण तर तुम्ही ऐकली असेलच.
'करावे तसे भरावे' ही म्हण तर तुम्ही ऐकली असेलच. असंच काहीसं वॉशिंग्टनमध्ये एका चोरासोबत घडलं आहे. झालं असं की, इथे एक चोर रस्त्याच्या कडेला त्याची कार पार्क करून दुकानात चोरी करायला गेला होता. पण जेव्हा तो परत आला तोपर्यंत त्याची कार दुसऱ्या चोराने पळवली होती.
केनेविक पोलीस डिपार्टमेंटने त्यांच्या फेसबुक पेजवर एक व्हिडीओ पोस्ट केला आणि त्यात सांगितले की, ही घटना रविवारी सकाळी सहा वाजता घडली. झालं असं की, गाडीचा मालक विलियम केली याने पोलिसांना सांगितले की, त्याची पिकअप गाडी कोणीतरी चोरी केली. आणि त्याने गाडीची तावी गाडीच्या आतच सोडली होती.
(Image Credit : Amar Ujala)
विलियमच्या तक्रारीवरून पोलिसांनी तपास सुरू केला. यादरम्यान जेव्हा सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी पाहिलं तेव्हा पोलिसांना या गोष्टीचा धक्का बसला की, ज्या व्यक्तीने गाडी चोरीची तक्रार केली होती. मुळात ती व्यक्ती एका दुकानात चोरी करायला आली होती.
व्हिडीओ फुटेजमध्ये स्पष्ट दिसत आहे की, गाडी चोरणाऱ्या चोराने गाडीच्या मागे त्याची बाइक उभी केली आणि नंतर तो कार घेऊन फरार झाला. यादरम्यान केली कारच्या मागे धावताना दिसला. कार भलेही अजून सापडली नसली तरी केली याला चोरीच्या आरोपाखाली तुरूंगात टाकण्यात आलं आहे.
फेसबुकवर गाडी चोरीचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर लोकांनी त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकाने लिहिले की, 'मी इतक्या लवकर कुणाला त्याच्या कर्माचं फळ मिळताना पाहिलं नाही'.