पोलीस मागावर असताना चोरानं थेट रेल्वे रुळांवर घातली कार, पाहा थरारक Video

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2021 12:49 PM2021-07-19T12:49:05+5:302021-07-19T12:52:48+5:30

पोलीस आपल्या मागावर असल्याचं लक्षात आल्यानंतर चोरानं समोर दिसेल त्या रस्तानं अन् वेगानं कार पळविण्यास सुरुवात केली. 

Thief drives stolen range rover on rail tracks reminds netizens of gta games | पोलीस मागावर असताना चोरानं थेट रेल्वे रुळांवर घातली कार, पाहा थरारक Video

पोलीस मागावर असताना चोरानं थेट रेल्वे रुळांवर घातली कार, पाहा थरारक Video

Next

पोलीस मागावर लागल्यानंतर चोर पळ काढण्यासाठी अनेकदा अशा काही मार्गांचा अवलंब करतात की त्याची जगभर चर्चा होते. नुकतंच ब्रिटनमध्ये एक चोर आलिशान कार चोरी करुन पळ काढण्याच्या प्रयत्नात होता. त्याचवेळी पोलिसांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. पण चोर पळ काढण्यात यशस्वी झाला. पोलिसांनीही हार मानली नाही आणि त्याचा पाठलाग करण्यास सुरुवात केली. पोलीस आपल्या मागावर असल्याचं लक्षात आल्यानंतर चोरानं समोर दिसेल त्या रस्तानं अन् वेगानं कार पळविण्यास सुरुवात केली. 

कार वेगानं पळवत असूनही पोलीस काही आपला माग काढणं सोडत नसल्याचं लक्षात येताच चोरानं थेट रेल्वे स्थानकात कार घुसवून रेल्वे रुळांवरुन कार चालवण्याचा अजब प्रकार केला. या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियात व्हायरल होत आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कारच्या ड्रायव्हरची माहिती मिळवण्यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत आणि चोरी करण्यात आलेली कार जप्त करण्यात आली आहे. लवकरच चोराला अटक करू असंही पोलिसांनी सांगितलं आहे. 

दोन पोलीस अधिकारी कार चालकाला कारमधून बाहेर येण्याची सूचना देत होते. पण कार चालक काही खाली उतरत नव्हता, असं या व्हिडिओमध्ये दिसून येत आहे. त्यानंतर पोलिसांना संशय आला आणि ते अधिक कठोरपणे चालकाना खाली उतरण्याच्या सूचना देतात. पण कार चालक खाली न उतरता थेट कार दामटवण्यास सुरुवात करतो. दोन्ही पोलीस अधिकाऱ्यांना धडक देऊन कार चालक पळ काढतो. त्यानंतर पोलीस मागावर असताना कार चालक थेट रेल्वे रुळांवर गाडी चालवत असतानाचा देखील एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. 

Web Title: Thief drives stolen range rover on rail tracks reminds netizens of gta games

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.