VIDEO : चोरी करण्यासाठी घरात घुसत होता चोर, पण दरवाज्यावरच अडकून पडला आणि...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2022 11:05 AM2022-05-25T11:05:09+5:302022-05-25T11:07:07+5:30

Viral Video : व्हिडीओत एक चोर चोरीच्या उद्देशाने घरात घुसण्याचा प्रयत्न करतो. पण यात त्याला यश मिळत नाही. व्हिडीओत असं दिसत आहे की, चोर घरात तेव्हा शिरला जेव्हा आजूबाजूला कुणी नव्हतं.

Thief enter the house to steal he got stuck at the door know funny reason | VIDEO : चोरी करण्यासाठी घरात घुसत होता चोर, पण दरवाज्यावरच अडकून पडला आणि...

VIDEO : चोरी करण्यासाठी घरात घुसत होता चोर, पण दरवाज्यावरच अडकून पडला आणि...

googlenewsNext

Thief Viral Video : चोर भलेही चोरी करताना हुशारी दाखवतात, पण कधी कधी एक चूक त्यांना महागात पडते. चोर तुमच्या समोरून चोरी करून जाऊ शकतात, पण प्रत्येकवेळी त्यांना यात यश मिळेलच असं नाही. चोरांचे चोरी करतानाचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. व्हिडीओत एक चोर चोरीच्या उद्देशाने घरात घुसण्याचा प्रयत्न करतो. पण यात त्याला यश मिळत नाही. व्हिडीओत असं दिसत आहे की, चोर घरात तेव्हा शिरला जेव्हा आजूबाजूला कुणी नव्हतं.

व्हिडीओ पाहून तुम्ही अंदाज लावू शकता की, चोर चोरी करण्यासाठी छतावर चढला आणि घरात शिरण्याचा प्रयत्न केला. पण कुत्र्यांमुळे तो आत जाऊच शकला नाही. कुत्र्यांपासून जीव वाचवण्यासाठी तो दरवाज्यावरच लटकून राहिला. यावेळी तो चांगलाच घाबरला होता. तो खाली उतरला तर काय होईल याचा अंदाज तुम्ही बांधू शकता. पण व्हिडीओ इथेच संपतो आणि पुढे काय होतं हे समजतच नाही. हा व्हिडीओ gieddee नावाच्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. 

सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून सोशल मीडिया यूजर्स पोट धरून हसत आहेत. अनेक यूजर्स हे जाणून घेण्यासाठी उत्सुक होते की, पुढे काय झालं. एका यूजरने लिहिलं की, 'मला वाटतं तो अजूनही तिथे लटकलेला असेल'. तेच एका दुसऱ्या यूजरने लिहिलं की, 'वेलकम' सिनेमात एक डायलॉग आहे ''ये राज भी उसी की साथ चला गया.' 
 

Web Title: Thief enter the house to steal he got stuck at the door know funny reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.