काय म्हणावे यांना...! चोरांनी अख्खी बिल्डिंगच चोरली, विटाही फोडून पळवल्या; जाणून घ्या नेमकं काय घडलं!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2022 02:56 PM2022-11-02T14:56:30+5:302022-11-02T15:07:59+5:30

आतापर्यंत आपण चोरीच्या अनेक घटना पाहिल्या असतील. कधी गाड्या चोरीच्या तर कधी पैशांच्या चोरीच्या पाहिल्या असतील. पण आता एका वेगळ्याच चोरीची घटना समोर आली.

Thieves stole the entire building broke even the bricks and ran away | काय म्हणावे यांना...! चोरांनी अख्खी बिल्डिंगच चोरली, विटाही फोडून पळवल्या; जाणून घ्या नेमकं काय घडलं!

काय म्हणावे यांना...! चोरांनी अख्खी बिल्डिंगच चोरली, विटाही फोडून पळवल्या; जाणून घ्या नेमकं काय घडलं!

googlenewsNext

आतापर्यंत आपण चोरीच्या अनेक घटना पाहिल्या असतील. कधी गाड्या चोरीच्या तर कधी पैशांच्या चोरीच्या पाहिल्या असतील. पण आता एका वेगळ्याच चोरीची घटना समोर आली. चोरांनी आख्खी शाळेची इमारतच पळवली. आता या इमारतीचा पायाच फक्त उरलाय.  

दक्षिण आफ्रीकेतील केपटाऊन मधील ही घटना आहे. चोरांनी या शाळेतील ब्लॅकबोर्ड, बल्ब, पंखे, टेबल, खिडकी, छत असं अन्य साहित्य चोरांनी पळवले असून हे सामान बाहेर विकले आहे. 

ज्या शोरुममधून साडी खरेदी केली, त्याच शोरुमबाहेर ती पेटवली; जाणून घ्या नेमकं काय घडलं!

एका अहवालानुसार ही शाळा २०१९ मध्ये बंद केली होती. या शाळेतील विद्यार्थ्यांना दुसऱ्या शाळेत पाठवले. यानंतर सहा महिन्यात चोरांनी या इमारतीची चोरी केली. आता या इमारतीचा पायाच फक्त शिल्लक राहिलाय.  गुगल मॅपमध्ये ही इमारत दिसत नाही, यात फक्त इमारतीच्या पाया दिसतोय. सोशल मीडियावर याचे फोटो व्हायरल झालेत. 

स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीवरुन, या शाळेच्या इमारतीमध्ये ५ क्लासरुम, २ टॉयलेट आणि फर्निचर तसेच इलेक्ट्रिकलचे सामान होते. चोरांनी या सामानाची चोरी तसेच इमारतीची एक-एक विटही चोरली. 

ही चोरी परिसरातील दारु पिणाऱ्यांनी केली असल्याचा आरोप नागरिकांनी केला. शाळा बंद झाल्यावर ते आजूबाजूला जमायचे. आता या इमारतीजवळ काँक्रीटशिवाय काहीही शिल्लक राहिलेले नाही.

Web Title: Thieves stole the entire building broke even the bricks and ran away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.