हेल्मेट कसे बनवले जातात? मेकिंग प्रोसेसचा व्हिडीओ बघून व्हाल अवाक्...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2024 04:06 PM2024-03-28T16:06:26+5:302024-03-28T16:10:40+5:30

Helmet Making Video : हेल्मेट कसं बनवलं जातं हे तुम्ही पाहिलंय का? हेल्मेट बनवणं किती मेहनतीचं काम आहे हे आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत.

This is how helmets are made see the video | हेल्मेट कसे बनवले जातात? मेकिंग प्रोसेसचा व्हिडीओ बघून व्हाल अवाक्...

हेल्मेट कसे बनवले जातात? मेकिंग प्रोसेसचा व्हिडीओ बघून व्हाल अवाक्...

Helmet Making Video : बाइक अपघाताच्या घटना रोज कुठेना कुठे घडत असतात. या अपघातांचे अनेक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. हे व्हिडीओ हैराण करणारे असतात. अनेकांचा यात जीवही जातो. अशात सतत हेल्मेट वापरण्याचा सल्ला दिला जातो. त्यासाठी सरकारने काही नियमही केले आहेत. अलिकडे बरेच लोक हेल्मेट वापरू लागले आहेत. पण हेल्मेट कसं बनवलं जातं हे तुम्ही पाहिलंय का? हेल्मेट बनवणं किती मेहनतीचं काम आहे हे आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत.

Natial drive नावाच्या इन्स्टा अकाऊंटवर एका कारखान्याचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. ज्यात काही कामगार हेल्मेट बनवताना दिसत आहेत. ही प्रक्रिया किती अवघड आहे तेच यात बघायला मिळतं एकावर एक कोटींग, वेगवेगळे थर त्यांना कोरडं करणं अशा अनेक गोष्टी केल्या जातात. यासाठी एका साच्याचा वापर केला जातो. ज्यात हेल्मेटचा बाहेरील भाग तयार होतो. त्यानंतर आत काही गोष्टी आणि फायबर ग्लास लावला जातो.

हा व्हिडीओ 60 हजारांपेक्षा जास्त वेळा बघण्यात आला आहे. तेच शेकडो लोकांनी यावर कमेंटही केल्या आहेत. काही लोकांनी सेफ्टीवरून प्रश्न उपस्थित केले तर काही लोक याचा बचाव करताना दिसत आहेत. एकाने लिहिलं की, स्वस्त आहे पण सुरक्षित नाही.

Web Title: This is how helmets are made see the video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.