ही लुटालूट! Apple स्टोअरमध्ये १०० लुटारू घुसले; नवे कोरे आयफोन पळविले
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2023 09:02 PM2023-09-27T21:02:03+5:302023-09-27T21:02:49+5:30
ही घटना अमेरिकेच्या फिलाडेल्फियातील असल्याचे सांगितले जात आहे. मास्क घातलेल्या १०० एक अल्पवयीन तरुणांनी काही दुकानांना लक्ष्य केले होते.
नवा आयफोन लाँच झाला की त्याला खरेदी करण्यासाठी लोकांनी किडणी विकल्याच्या घटना आहेत. आता तर आयफोन १५ सिरीज एवढी महागडी आहे की सर्वाधिक महाग आयफोन दोन लाखांवर मिळत आहे. अशातच महागडे आयफोन लुटण्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
ही घटना अमेरिकेच्या फिलाडेल्फियातील असल्याचे सांगितले जात आहे. मास्क घातलेल्या १०० एक अल्पवयीन तरुणांनी काही दुकानांना लक्ष्य केले होते. यामध्ये अॅप्पलचे स्टोअरदेखील होते. काही वेळाने तिथे पोलीस पोहोचले, परंतू तोवर उशीर झाला होता.
इंटरनेटवर दोन व्हिडीओ व्हायरल होत आहेत. जॅकेट आणि तोंड झाकलेले तरुण अॅप्पलच्या स्टोअरमध्ये घुसले आहेत. त्यांची संथ्या जवळपास १०० च्या वर असल्याचे सांगितले जात आहे. फिल्मी अंदाजात ते स्टोअरच्या आत धावत जाताना दिसत आहेत. तसेच मिळेल तो फोन, बॉक्स चोरी करून पळताना दिसत आहेत. काही तरुणांना पोलिसांनी अॅपल स्टोअरमध्येच पकडल्याचे दुसऱ्या व्हिडीओत दिसत आहे.
Police trying to apprehend looters caught exiting a store.#Philadelphia#Philly#Pennsylvania#Looting#Riot#CenterCitypic.twitter.com/lF4ZWhefuK
— Raw Reporting (@Raw_Reporting) September 27, 2023
मंगळवारी रात्री 8 वाजता अॅपल स्टोअरला लुटण्याच्या उद्देशाने लक्ष्य करण्यात आले होते. मास्क घातलेल्या अनेक तरुणांनी स्टोअरमध्ये प्रवेश केला. पोलिसांनी अनेक तरुणांचा पाठलाग केला आणि काहींना पकडण्यात यश आले. त्यांच्याकडून आयफोन आणि आयपॅड जप्त करण्यात आले आहेत.