तब्बल 94 लाख रुपयांना विकली गेली ही जिन्स, एवढं काय आहे हिच्यात खास? जाणून तुम्हीही थक्क व्हाल!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2022 12:13 PM2022-12-15T12:13:33+5:302022-12-15T12:14:40+5:30
माध्यमांतील वृत्तांनुसार, ही जिन्स 1857 मध्ये एका वादळामुळे बुडालेल्या जहाजाच्या ट्रंकमध्ये सापडली आहे.
एका जिन्सची किंमत किती असू शकते? जास्तीत-जास्त 1 ते 10 लाख रुपये. आता आपण विचार करत असाल, की एवढी महागडी जिन्स कोण वापरत असले. पण... आपण हे जाणून थक्क व्हाल, की एका लिलावात एक जुनी आणि फाटकी जीन्स तब्बल 94 लाख रुपयांहूनही अधिक किंमतीत विकली गेली आहे. आता आपण विचार करत असाल, की या जिन्समध्ये असे काय असेल? महत्वाचे म्हणजे, या जिन्स ना सोन्याने बनवलेली होती, ना हिच्यावर हिरे लावण्यात आलेले होते. खरे तर, या जिन्सला स्पेशल बनवते, या हिचे वय. हो, हे खरे आहे. ही जिन्स जगातील सर्वात जुनी जिन्स असल्याचे मानले जात आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण? -
माध्यमांतील वृत्तांनुसार, ही जिन्स 1857 मध्ये एका वादळामुळे बुडालेल्या जहाजाच्या ट्रंकमध्ये सापडली आहे. ही जिन्स अमेरिकेत झालेल्या एका लिलावात 'जगातील सर्वात महागडी जिन्स' म्हणजून एका व्यक्तीने तब्बल 1.14 लाख डॉलर (जवळपास 94.20 लाख रुपये) एवढ्या किंमतीत विकत घेतली आहे. या 5 बटन असलेल्या पांढऱ्या रंगाच्या जिन्सचा फोटोही सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. हिचा संबंध जर्मन-अमेरिकन व्यापारी लेवी स्ट्रॉस सोबत असल्याचे मानले जात आहे. मात्र, आधिकृतपणे, लेवी स्ट्रॉस अँड कंपनीची पहिली जिन्स 1873 मध्ये तयार झाली होती. ही जिन्स याच्या 16 वर्ष आधीची आहे.
जहाजाच्या अवशेषांमध्ये सापडली ही जिन्स -
ही जिन्स कुणी तयार केली यासंदर्भात अद्याप पुष्टी झालेली नाही. मात्र, ही जिन्स 12 सप्टेंबर 1857 पूर्वी तयार झाली आहे. कारण, जे जहाज 12 सप्टेंबर 1857 रोजी एका वादळामुळे बुडाले होते, त्या जहाजाच्या अवशेषांमध्येसापडली आहे. हे जहाज सॅन फ्रान्सिस्कोहून पनामा मार्गे न्यूयॉर्कला जात होते. महत्वाचे म्हणजे, या हिच्या आधीची जिन्स असल्याचा कसलाही पुरावा सध्या उपलब्ध नाही. काही महिन्यांपूर्वी, लिवाइस (Levi's) जिन्सची एक जोडी 62 लाख रुपयांना विकली गेली होती. जिन्सची ही जोडी, 1880 मध्ये अमेरिकेतील एका निर्जन ठिकाणी असलेल्या खदानीत सापडली होती.