तरूणीचे कपडे पाहून एअरलाइन्स कंपनी भडकली, फ्लाइट सोडण्याची दिली धमकी!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2019 01:53 PM2019-03-15T13:53:31+5:302019-03-15T13:58:35+5:30
वेगवेगळ्या एअरलाइन्स वेगवेगळ्या वादग्रस्त घटना आपण नेहमीच वाचत-पाहत असतो. आता ब्रिटनच्या एका एअरलाइन्सने एका महिलेसोबत गैरवर्तणूक केली आहे.
वेगवेगळ्या एअरलाइन्स वेगवेगळ्या वादग्रस्त घटना आपण नेहमीच वाचत-पाहत असतो. आता ब्रिटनच्या एका एअरलाइन्सने एका महिलेसोबत गैरवर्तणूक केली आहे. एका २१ वर्षीय तरूणीला एअरलाईन्सने तिच्या कपड्यांमुळे प्रवास करण्यावर नाराजी व्यक्त केली. रिपोर्टनुसार, विमानात शिरल्यावर या तरूणीला व्यवस्थित कपडे परिधान करण्यासाठी धमकवण्यात आले आणि तिला विमानातून उरतण्यास सांगण्यात आले.
(Photo Credit : www.itv.com)
ही घटना आहे थॉमस कुक एअरलाइन्स (Thomas Cook Airlines) कंपनीतील. सीएनएनच्या एका रिपोर्टनुसार, एमिली ओकोन्नोर नावाची तरूणी २ मार्चला यूकेच्या बर्मिंघम एअरपोर्टहून टेनेरिफ आयलॅंडला जाण्यासाठी थॉमस कुक एअरलाइन्सच्या विमानात शिरली. दरम्यान विमानाच्या क्रू सदस्यांनी तिला तिचे कपडे हिसेंचं कारण ठरू शकतात असं सांगितलं.
एमिलीने सांगितले की, विमानाचा मॅनेजर त्याच्या चार इतर सदस्यांसोबत तिच्याजवळ आले. तिला जॅकेट परिधान करण्यास सांगितले आणि धमकी दिली की, तिला विमानातून उतरवलं जाईल. एमिलीने सांगितले की, एअरलाइन्स स्टाफने सांगितले की, 'ठीक कपडे परिधान कर नाही तर फ्लाइट सोड'.
एमिलीने हा संपूर्ण प्रकार ट्विटरवर शेअर केलाय. त्यात तिने लिहिले की, 'एअरलाइन्सने मला सांगितले की, माझे कपडे बरोबर नसल्याने मी फ्लाइटमध्ये प्रवास करू शकत नाही. मी आजूबाजूला बसलेल्या प्रवाशांना देखील माझ्या कपड्यांबाबत विचारले तर कुणीही काहीही उत्तर दिलं नाही. त्यामुळे मला फारच वाईट वाटलं. इतक्यात एक व्यक्ती मला म्हणाला की, काय तुम्ही जॅकेट परिधान करू शकत नाही?.
Flying from Bham to Tenerife, Thomas Cook told me that they were going to remove me from the flight if I didn’t “cover up” as I was “causing offence” and was “inappropriate”. They had 4 flight staff around me to get my luggage to take me off the plane. pic.twitter.com/r28nvSYaoY
— Emily O'Connor (@emroseoconnor) March 12, 2019
या तरूणीने क्रॉप टॉप आणि पॅंट परिधान केली होती. तिने सांगितले की, मला माझ्या कपड्यांवरून एअरपोर्टपासूनच हटकलं जात होतं. विमानात आल्यावर तर मला पुन्हा पुन्हा टोकलं गेलं. क्रू सदस्यांनी मला स्वत:ला पूर्णपणे झाकून घेण्यास सांगितले.
दरम्यान, नंतर थॉमस कुक एअरलाइन्सने एमिली ओकोन्नोरची माफी मागितली. आणि केबिन सर्व्हिसच्या निर्देशकाला या प्रकरणी चौकशी करण्याचे आदेश दिले. एअरलाइन्सने स्पष्टीकरणात सांगितले की, वेगवेगळ्या विमान कंपन्यांनी प्रवाशांच्या कपड्यांबाबत वेगवेगळे नियम तयार केले आहेत. हे पुरूष आणि महिला दोघांनाही समान रूपाने लागू होतात. अशावेळी आमच्या क्रू सदस्यांना प्रवाशांकडून नियमांचं पालन करवून घेणं फार कठीण होऊन बसतं. अशात परिस्थीती बिघडूही शकते. थॉमस कुक एअरलाइन्स कंपनीच्या कपड्यांसंबंधी नियमांमध्ये कोणताही प्रवासी हिसेंच कारण ठरू शकतील असे कपडे परिधान करू शकत नाही.