रोबोटलाही मागे टाकेल असा स्पीड, व्हिडिओ पाहुन लोक म्हणाले भारतात मशिनची गरजच काय?
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2022 02:14 PM2022-05-17T14:14:02+5:302022-05-17T14:21:28+5:30
आम्ही तुम्हाला एक असा व्हिडिओच दाखवणार आहोत ज्यात माणसं रोबोट अधिक वेगाने काम करत आहेत. तुमचाच काय हा व्हिडिओ पाहिल्यानंतर खुद्द रोबोट्सचाही त्यांच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही.
सध्याचं युग हे तंत्रज्ञानाचं युग आहे. हे तंत्रज्ञान इतकं पुढे गेलंय की हॉटेलमध्ये, घरात काम करणारे रोबोट्स आता पाहायला मिळतात. पण माणसच रोबोटसारखी कामं करु लागली तर? आम्ही तुम्हाला एक असा व्हिडिओच दाखवणार आहोत ज्यात माणसं रोबोटपेक्षाही अधिक वेगाने काम करत आहेत. तुमचाच काय हा व्हिडिओ पाहिल्यानंतर खुद्द रोबोट्सचाही त्यांच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही.
व्हिडिओत तुम्ही पाहु शकता की तीन माणसे कोबी सोलुन ते पोत्यात भरण्याचे काम करत आहेत. जमीनीवर भरपुर कोबी पडलेला आहे. यापैकी एकजण तो वेगाने उचलतोय, दुसरा त्याहीपेक्षा जास्त वेगाने तो कापतोय अन् तिसरा तो वेगानेच पोत्यात भरतोय. या तिघांचा वेग कोणत्याही मशिनला लाजवेल असा आहे. त्यातील कोबी कापणारा व्यक्ती तर सराईतपणे हात चालवतोय. हे ह्युमन रोबोट्स सध्या सोशल मिडियावर चर्चेचा विषय ठरतायत.
& this is why India doesn't need robotic automation... pic.twitter.com/igsXha937A
— Dr. Ajayita (@DoctorAjayita) May 6, 2022
ट्वीटरवरील फक्त ५३ सेकंदाचा व्हिडिओ ६ लाख २५ हजार जणांनी पाहिला आहे. ३७ हजार लोकांनी तो व्हिडिओ लाईक केला आहे. अनेकांनी हे तिघे रोबोटपेक्षाही वेगवान आहेत अशी कमेंट केली आहे.